बाल शिवाजी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश…..
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे आयोजित इयत्ता 4 थी प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व 7 वी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2025-26 मध्ये ब्राह्मण सभा संचालित बाल शिवाजी प्राथमिक शाळा, जठारपेठ, अकोला येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करीत शिष्यवृत्ती प्राप्त करून शाळेच्या यशस्वी परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. या परीक्षेत वर्ग 4 थी तील 17 तर वर्ग 7 वी तील 25 विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिपच्या जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत येण्याचा मान पटकावून शाळेचा नावलौकिक उंचावला.
वर्ग 4 थी तील गुणवत्ता यादीत झळकलेले विद्यार्थी-
निहिर जितेंद्र जोशी (जिल्ह्यातून 7 वा) अनुश्री धीरज पाटील (जिल्ह्यातून 8 वी) कैवल्य चैतन्य कुलकर्णी (जिल्ह्यातून 11 वा) शिवांश आशुतोष गिरी (जिल्ह्यातून 13 वा) आनंदी अनिल कुलकर्णी (जिल्ह्यातून 16 वी) ईश्वरी अविनाश काठोळे (जिल्ह्यातून 24 वी) आर्या राजाराम म्हैसने (जिल्ह्यातून 37 वी) अमेय धीरज भिसे (जिल्ह्यातून 45 वा) श्रावणी निलेश नावकार (जिल्ह्यातून 58 वी) शाश्वत संतोष हाडोळे (जिल्ह्यातून 60 वा) आनंदी सचिन कराळे (जिल्ह्यातून 79 वी), आज्ञावली विकासराव पाटील (जिल्ह्यातून 80 वी), भार्गव अनिल भगत (जिल्ह्यातून 81 वा), देवांश श्रीकांत देशमुख (जिल्ह्यातून 105 वा), अधिरा नारायण जाधव (जिल्ह्यातून 106 वी) अर्पिता कैलास गोरे (जिल्ह्यातून 3 री), रुद्रांश रविश्वर घुगे (जिल्ह्यातून 4 था)
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशामागे मराठी विषयासाठी अश्विनी पांडे व अंजली देशमुख, गणित विषयासाठी रागिणी बक्षी, साक्षी सहस्त्रबुद्धे, इंग्रजी विषयासाठी अनिता वानखेडकर, रश्मी अग्रवाल व बुद्धिमत्ता या विषयासाठी अंजली देशमुख, रश्मी अग्रवाल या शिक्षिकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
तसेच इयत्ता 7 वी तील स्वरा प्रफुल्ल भालतिलक (जिल्ह्यातून 2 री), अर्णव विजय धोत्रे (जिल्ह्यातून 3रा) श्रीयश विनायक पाठक(जिल्ह्यातून 4 था) आर्या राजू आळणे (जिल्ह्यातून 5) वी महेश किशोर इंगळे (जिल्ह्यातून 9 वा), समृद्धी सुधीर भगत (जिल्ह्यातून 10 वी) रेणुका समीर जोशी (जिल्ह्यातून 11 वा) सर्वेश श्रीराम झटाले (जिल्ह्यातून 13 वा),ओजस्वी अविनाश काठोळे (जिल्ह्यातील 15 वा), सोहम अमोल तायडे (जिल्ह्यातून 18 वा), कृष्णवी उमेश सपकाळ (जिल्ह्यातून 19 वा),
आनंदीनी दीपक मानकर (जिल्ह्यातून 30 वा), नील सागर ठाकरे (जिल्ह्यातून 31 वा), प्रचिती उज्वल चोरे (जिल्ह्यातून 39 वी) कृष्णाई मनोज राऊत (जिल्ह्यातून 45 वी), पार्थ अनंत मसने (जिल्ह्यातून 53 वा), अंश मोहन गावंडे (जिल्ह्यातून 54 वा), स्वरा विनोद बोरोकार (जिल्ह्यातून 55 वी) भाग्येश विक्रम गावंडे (जिल्ह्यातून 56 वा) आराध्या सुशील इंगळे (जिल्ह्यातून 57 वी) हेमंत स्वप्निल मानकर (जिल्ह्यातून 62 वा) आनंद अजरांबर गावंडे (जिल्ह्यातून 63 वा) वरदा विक्रांत कुलकर्णी (जिल्ह्यातून 71 वा),
यदोविर विशाल चोरे (जिल्ह्यातून 75 वा) शाश्वत शिवाजी नागरे (जिल्ह्यातून 81 वा) यांनीही उल्लेखनीय यश संपादन करून शाळेचा गौरव वाढविला.
मराठी विषयासाठी रश्मी जोशी,वैशाली पाटील गणित विषयासाठी श्रद्धा रेलकर, मीना मुरुमकार, इंग्रजी विषयासाठी रेणुका भाले, अपेक्षा आवळे तसेच बुद्धिमत्ता विषयासाठी मीना मुरुमकार, श्रद्धा रेलकर या शिक्षिकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.. या यशामागे विद्यार्थ्यांची जिद्द, पालकांचे सहकार्य आणि शिक्षकांचे नियोजनबद्ध मार्गदर्शन मोलाचे ठरले.
विद्यार्थ्यांच्या या उज्ज्वल यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष श्री. अविनाश देव, कार्यकारिणी सदस्या सौ. अनघा देव, उपाध्यक्ष श्री. नरेंद्र पाठक सचिव श्री. मोहन गद्रे तसेच माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता जळमकर व प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. कीर्ती चोपडे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी, त्यांचे पालक आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
