बाल शिवाजी शाळेत ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा!

जठारपेठ येथील ब्राह्मण सभा शिक्षण संकुलांतर्गत बाल शिवाजी प्राथमिक व माध्यमिक शाळेत ८० वा स्वातंत्र्य दिन देशभक्तीपूर्ण वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
माध्यमिक शालांत परीक्षा २०२६-२७ मध्ये प्रथम क्रमांक पटकावलेल्या चि. युगंधर निलेश पाकदुने व चि. अभिनव निलेश सोनी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थेचे सहसचिव श्री. नरेंद्र देशपांडे यांनी युवा पिढी हीच देशाचे उज्ज्वल भविष्य असून स्वातंत्र्याचे रक्षण करण्याची जबाबदारी तरुण पिढीची असल्याचा प्रेरणादायी संदेश दिला.
विद्यार्थ्यांनी राज्यगीत, ‘जयोस्तुते’ तसेच विविध देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. वर्ग ७ वीच्या विद्यार्थ्यांनी ‘पवित्रतेचा पुण्याईचा, आमुचा मंगल देश’ हे देशभक्तीपर गीत सादर केले.
यावेळी चि. ओम गावंडे याने थोर सेनानी मथुराबाई लोटलीकर, कु. अन्वया पाकदुने हिने क्रांतिकारक ‘मास्टर दा सूर्यसेन’, तर चि. ओजस माडीवाले व कु. ऋग्वेदा उगले यांनी स्वातंत्र्याच्या इतिहासाचे महत्त्व याविषयी प्रभावी मनोगत व्यक्त केले.
🌟 कु. वसुंधरा रेवस्कर हिने महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक, वर्ग ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात ८ वे स्थान तसेच गणित प्रज्ञाशोध व विज्ञान विस्डम परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केल्याबद्दल तिचे विशेष कौतुक करण्यात आले.
तसेच शिष्यवृत्ती परीक्षा, गणित प्रज्ञाशोध, विज्ञान व विज्ञान विस्डम परीक्षेतील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा उत्साहात पार पडला. 🏆👏
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. मीना मुरुमकार यांनी केले, तर संचालन कु. तनया निलेश अनासने (वर्ग ७) हिने केले.
कार्यक्रमास संस्थेचे सचिव श्री. मोहन गद्रे, सहसचिव श्री. नरेंद्र देशपांडे, कार्यकारिणी सदस्या सौ. वैशाली देशपांडे, शाळा समिती सदस्य श्री. महेश कोतेगावकर व सौ. भक्ती बिडवाई, मुख्याध्यापिका सौ. संगीता जळमकर व श्रीमती कीर्ती चोपडे, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, पालकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सांगता ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रभक्तीपर गीताने करण्यात आली.
जय हिंद!