बाल शिवाजी शाळेत विठ्ठलनामाच्या गजरात आषाढी एकादशी उत्साहात साजरी….

“ब्राह्मण सभा संचालित बाल शिवाजी प्राथमिक शाळेत आषाढी एकादशीनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे उत्साहात आयोजन करण्यात आले. यानिमित्त संपूर्ण शाळा विठ्ठल नामाच्या अखंड गजराने दुमदुमून गेली असून, सर्वत्र भक्तिमय आणि आनंदमय वातावरणाची अनुभूती निर्माण झाली.” वर्ग 1 ली तील विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांच्या वेशभूषेत सहभागी होत संत परंपरेचा उत्साहाने अनुभव घेतला. यज्ञेश योगेश बोरे याने विठ्ठलाची आणि दैवी सिद्धेश सावंत हिने रखुमाईची वेशभूषा साकारली. ज्ञानबा-तुकाराम’च्या गजराने आसमंत दुमदुमत असताना विद्यार्थ्यांनी पालखी खांद्यावर घेत पारंपरिक पावली खेळत वारकरी संप्रदायाची भक्ती, संस्कृती आणि परंपरा जिवंत केली.” वारकऱ्यांनी रिंगण घातले. यावेळी जनाबाई, ज्ञानेश्वर, तुकाराम, मुक्ताबाई, गाडगेबाबा, नामदेव महाराज यांच्या भूमिका विद्यार्थ्यांनी साकारल्या. सभोवतालच्या परिसरात विद्यार्थ्यांनी या संतांच्या जीवनावर प्रकाश टाकत स्वच्छता व वृक्षरोपणाचे महत्त्व सांगितले. वर्गा-वर्गातून अभंग, भारुडे, गाणी व गोष्टींच्या माध्यमातून आषाढी एकादशीचा कार्यक्रम सादर करण्यात आला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये भक्तीभाव, पर्यावरण प्रेम आणि स्वच्छतेचे महत्व अधोरेखित झाले. या कार्यक्रमासाठी वर्ग 1 लीच्या वर्ग शिक्षिका नयना जोशी, अंजली दिवेकर, राजश्री पांडव या शिक्षिकांनी मेहनत घेतली. संस्थेच्या कार्यकारिणी सदस्या मा. सौ. वैजयंती पाठक यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती किर्ती चोपडे, सौ. संगीता जळमकर पर्यवेक्षिका रागिणी बक्षी, किरण मुरूमकार तसेच सर्व शिक्षिका, कर्मचारी वृंद उपस्थित होते. संपूर्ण शाळा विठ्ठल नामाच्या गजरात दुमदुमली.