बाल शिवाजी शाळेत आर्यभट्ट खागोल मंडळाचे उदघाटनतसेच बाल विज्ञान परिषद मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न…
ब्राह्मण सभा अंतर्गत बाल शिवाजी बाल शिवाजी शाळेत आर्यभट्ट खगोल मंडळाचे उद्घाटन करण्यात आले. यावर्षी या मंडळाचे हे दुसरे वर्ष आहे. याप्रसंगी मा. श्री. नितीन ओक सर हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. अवकाशातील खगोलीय घटनांबाबत विद्यार्थ्यांच्या मनात कुतूहल असते आणि या कुतूहलाला खतपाणी देण्याचे प्रमुख काम या मंडळातर्फे करण्यात येते व विविध उपक्रम घेण्यात येते. याप्रसंगी सरांनी खगोलशास्त्राचा थोडक्यात परिचय करून दिला. मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती सुद्धा दिली.
तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग भारत सरकार अंतर्गत राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद (NCSC) यामध्ये घेण्यात येणार्या संशोधन प्रकल्प स्पर्धे विषयी मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेचे जिल्हा समन्वयक मा. श्री नितीन ओक सर उपस्थित होते.
सर्वप्रथम ओक सरांनी बालविज्ञान परिषदेचे स्वरूप स्पष्ट केले. संशोधन प्रकल्पांतर्गत स्थानिक समस्या निवारणासाठी तसेच काही स्थानिक घटकांचा उपयोग करून विद्यार्थ्यांनी संशोधक वृत्तीने प्रकल्प सादर करावेत हा महत्त्वाचा उद्देश सरांनी यावेळी विशद केला.
आपल्या परिसराशी निगडित अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या प्रकल्पांची माहिती सुद्धा सरांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिली.
विद्यार्थ्यांच्या प्रकल्प सादरीकरणात पालक व मार्गदर्शक शिक्षकांची काय भूमिका असावी याबाबत विज्ञान शिक्षकांना सुद्धा यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी आपला संशोधन प्रकल्प अभ्यासू वृत्तीने सादर करावा चॅट जीपीटी, गुगल यांसारख्या माध्यमांचा वापर न करता पुस्तकांचा वापर करूनच माहिती मिळवावी असे आवाहनही विद्यार्थ्यांना सरांनी केले. राष्ट्रीय स्तरापर्यंत आपला प्रकल्प नेण्यासाठी नक्की प्रयत्न करावे अशी अपेक्षा सुद्धा त्यांनी विद्यार्थ्यांकडून यावेळी व्यक्त केली.
या कार्यशाळेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता जळमकर, पर्यवेक्षिका रागिणी बक्षी, विद्यार्थी व विज्ञान शिक्षिका उपस्थित होते.
