🎶🏆 तानसेन संगीत विद्यालयाचे शास्त्रीय संगीत परीक्षेत घवघवीत यश! 🏆🎶
ब्राह्मण सभा अंतर्गत बाल शिवाजी शाळा, जठारपेठ, अकोला येथे कार्यरत तानसेन संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मिरज आयोजित शास्त्रीय संगीत परीक्षा – २०२६ मध्ये उल्लेखनीय यश संपादन करून विद्यालयाच्या गौरवशाली परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. 🌹
🎼 प्रारंभिक (गायन/हार्मोनियम)✨ विशेष योग्यता : आदिनाथ सारंग सोमण, स्वरा संदीप झोडपे, स्वरा नितीन भोजापुरे, आर्या गजानन शेंडकर
🎼 प्रवेशिका प्रथम (गायन)🥇 प्रथम श्रेणी : तनुश्री नागोराव गव्हाळे, अदिश्री शरद इंगळे, आत्मजा प्रदीप चौखंडे
🎼 प्रवेशिका पूर्ण (गायन)🥇 प्रथम श्रेणी : त्रिष्णा प्रवीण कानकिरड, पयोष्णी प्रसन्न देशपांडे, अर्णव रवींद्र भांबेरे, शांभवी किरण सुदामे, काव्या जयंत पाठक, परी सुधीर गाडगे
🎼 मध्यमा प्रथम (गायन)🥇 प्रथम श्रेणी : शरण्या संग्राम खानझोडे
🌺 या यशामागे सौ. सरोज जोशी (गायन) व पुरुषोत्तम कोरान्ने (तबलावादन) यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
💐 सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे व मार्गदर्शकांचे मनःपूर्वक अभिनंदन!
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. अविनाश देव, सचिव मोहन गद्रे, कार्यकारिणी सदस्या सौ. अनघा देव, माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता जळमकर, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. कीर्ती चोपडे, तसेच सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
👏 हार्दिक अभिनंदन! पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा! 🌹🎵
