प्रवेशोत्सवातून बाल शिवाजी प्राथमिक शाळेत नव्या शैक्षणिक वर्षाचे उत्साहात स्वागत

अकोला : ब्राह्मण सभा संचलित बाल शिवाजी प्राथमिक शाळा, जठारपेठ येथे मंगळवार, दि. 30 जून 2026 रोजी नवीन शैक्षणिक वर्ष 2026-27 च्या स्वागतार्थ प्रवेशोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. नवीन विद्यार्थ्यांचे फुलांच्या वर्षावात, टाळ्यांच्या गजरात, आरती ओवाळून तसेच शंखनाद करून जंगी स्वागत करण्यात आले. या सोहळ्यात पालकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

प्रवेशोत्सवानिमित्त शाळा फुगे, आकर्षक रांगोळी आणि सुंदर स्वागतद्वाराने सजविण्यात आली होती. प्रसन्न वातावरणात विद्यार्थ्यांनी विद्येची देवता सरस्वतीचे दर्शन घेऊन वर्गात प्रवेश केला. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले

विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी आत्मीयता निर्माण व्हावी, त्यांचा आत्मविश्वास वाढावा आणि शिक्षणाची गोडी लागावी या उद्देशाने शिक्षकांनी प्रेरणादायी कथा व प्रसंग सांगितले. या कथांमधून प्रामाणिकपणा, मेहनत, शिस्त, मैत्री आणि शिक्षणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना प्रभावीपणे समजावून सांगण्यात आले. रंगतदार कथाकथनामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंद, कुतूहल आणि शिकण्याची उत्सुकता निर्माण झाली.

शाळेतील आनंदी, खेळीमेळीचे आणि आपुलकीचे वातावरण पाहून विद्यार्थी आनंदित झाले, प्रवेशोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले असून नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साहपूर्ण सुरुवात झाली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. यावेळी ब्राह्मण सभेचे सचिव श्री. मोहन गद्रे, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका किर्ती चोपडे, माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता जळमकर तसेच किरण मुरूमकर, रागिणी बक्षी आणि भारती कुलकर्णी उपस्थित होत्या.

संपूर्ण कार्यक्रम आनंद, उत्साह आणि हर्षोल्हासपूर्ण वातावरणात पार पडला.

प्रवेशोत्सवातून बाल शिवाजी प्राथमिक शाळेत नव्या शैक्षणिक वर्षाचे उत्साहात स्वागत

अकोला : ब्राह्मण सभा संचलित बाल शिवाजी प्राथमिक शाळा, जठारपेठ येथे मंगळवार, दि. 30 जून 2026 रोजी नवीन शैक्षणिक वर्ष 2026-27 च्या स्वागतार्थ प्रवेशोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. नवीन विद्यार्थ्यांचे फुलांच्या वर्षावात, टाळ्यांच्या गजरात, आरती ओवाळून तसेच शंखनाद करून जंगी स्वागत करण्यात आले. या सोहळ्यात पालकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

प्रवेशोत्सवानिमित्त शाळा फुगे, आकर्षक रांगोळी आणि सुंदर स्वागतद्वाराने सजविण्यात आली होती. प्रसन्न वातावरणात विद्यार्थ्यांनी विद्येची देवता सरस्वतीचे दर्शन घेऊन वर्गात प्रवेश केला. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.