बाल शिवाजी माध्यमिक शाळेत योग दिन उत्साहात साजरा…..
ब्राह्मण सभा संचलित बाल शिवाजी माध्यमिक शाळा, जठारपेठ येथे शनिवार दि. 21-06-26 रविवार रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी मा. सौ. मनीषा नाईक आणि सौ. दीप्ती जोशी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या
दीप प्रज्ज्वलनाने करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. मा. सौ. मनीषा नाईक आणि सौ. दीप्ती जोशी यांचे स्वागत शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता जळमकर यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ पूर्वा सोमण यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वेदांत कुटे याने केले.
आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यामागची संकल्पना वर्ग १० विची विद्यार्थिनी समृद्धी मगर हिने स्पष्ट केली. प्राणायामाचे महत्त्व पूर्वा भातखडे हिने आपल्या भाषणातून स्पष्ठ केले. व्यायामाची आवश्यकता अनुजा काशीद हिने सांगितले. संस्थेतर्फे आयोजित केलेल्या योगासन वर्गात योगाभ्यास केल्याने झालेला फायदा राजस्वी शेगोकार आणि अर्श शिरभाते या दोघांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला.
मा. मनीषा नाईक यांनी आपल्या भाषणातून यशस्वी जीवनाची चतु:सुत्री आणि तीन तत्व आवश्यक असतात ती जर आत्मसात केली आणि आचरणात आणली तर मानवी जीवन आरोग्यदायी निरामय कसे होते. याबाबत मार्गदर्शन केले. तसेच मा. दीप्ती जोशी यांनी विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि नियमित योगसाधनेद्वारे विद्यार्थी स्वविकास कसा साधू शकतील याबाबत विचार व्यक्त केले. त्यानंतर योग दिनाच्या निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांनी व शिक्षिकांनी विविध योगासनांची प्रात्यक्षिके, सामूहिक सूर्यनमस्कार आणि प्राणायाम सादर करून योगसाधना केली. कार्यक्रमाची सांगता एकात्मता मंत्राने करण्यात आली
या कार्यक्रमाला संस्थेचे सचिव श्री. मोहन गद्रे, विद्यार्थी शिक्षिका आणि कर्मचारीवर्ग उपस्थित होते.
