दि. 18 मार्च 2025 रोजी ब्राह्मण सभा, अकोला संस्थेतर्फे महानगरपालिकेतील नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांचा तसेच स्वीकृत सदस्यांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमात महानगरपालिकेत निवडून आलेले श्री. निलेश देव व श्री. प्रशांत जोशी तसेच स्वीकृत सदस्य सौ. चंदाताई शर्मा व श्री. गिरीश गोखले यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
या प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी, मान्यवर व शाळेतील शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारीउपस्थित होते. उपस्थितांनी सर्व मान्यवरांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. सन्मानित सदस्यांनीही आपल्या मनोगतातून नागरिकांच्या अपेक्षांची जाणीव ठेवून प्रामाणिकपणे काम करण्याचा संकल्प व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केले. हा सन्मान सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या पार पडला.