एम.टी.एस. (जळगांव ) MTS (Maharashtra Talent Search) परीक्षेत बाल शिवाजी शाळेचे सुयश …..
ब्राह्मण सभा संचालित बाल शिवाजी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी एम.टी.एस. जळगांव MTS (Maharashtra Talent Search) यांच्या तर्फे 2025-26 या सत्रात घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश प्राप्त करून, अकोल्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. MTS (Maharashtra Talent Search) ही परीक्षा Modern Education Society यांच्या Centre for Talent Search and Excellence मार्फत घेतली जाणारी स्पर्धा परीक्षा आहे. MTS ही राज्यस्तरीय गुणवत्ता शोध परीक्षा असून विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्ता आणि अभ्यासाची चाचणी घेण्यासाठी घेतली जाते.
वर्ग 2 री तील शर्विल आशिष फुंडकर (केंद्रातून प्रथम), राज्यातून 16 वा क्रमांक, वर्ग 2 री तील अमृत अनिल बढे (केंद्रातून 2 रा) राज्यातून 17 वा क्रमांक, वर्ग 2 री तील परिधी प्रफुल्ल काळणे (केंद्रातून 5 वी) राज्यातून 22 वा क्रमांक, वर्ग 3 री तील नील अनिल लव्हाळे (केंद्रातून 3 रा) राज्यातून 18 वा क्रमांक, वर्ग 3 री तील अद्वैता शिवाजी देशमुख (केंद्रातून 4 थी) राज्यातून 21 वा क्रमांक, वर्ग 3 री तील स्पृहा नीलकंठ वानरे (केंद्रातून 6 वी) राज्यातून 23 वा क्रमांक, वर्ग 4 थी तील अनुश्री धीरज पाटील (केंद्रातून 5 वी) राज्यातून 16 वा क्रमांक, वर्ग 4 था शाश्वत संतोष हाडोळे (केंद्रातून 12 वा) राज्यातून 25 वा क्रमांक, वर्ग 4 थी तील शिव श्रीकृष्ण धाये (केंद्रातून 8 वा) राज्यातून 21 वा, वर्ग 6 वा तन्मय सचिन ताडे (केंद्रातून 1 ला) राज्यातून 2 रा, वर्ग 6 वा गार्गी पराग देशमुख (केंद्रातून 5 वी) राज्यातून 16 वा क्रमांक, वर्ग 6 वा अद्वैत प्रवीण गायकवाड (केंद्रातून 5 वा) राज्यातून 16 वा क्रमांक, वर्ग 6 वा वरून रोहित चांडक (केंद्रातून 6 वा) राज्यातून 17 क्रमांक, वर्ग 6 वा ओजस अमोल माडीवाले (केंद्रातून 7 वा) राज्यातून 19 वा, वर्ग 6 वा आर्यही अमय मानकर (केंद्रातून 7 वी) राज्यातून 19 वा क्रमांक, वर्ग 6 वा अवनीश मुकेश निचळ (केंद्रातून 7 वा) राज्यातून 19 वा क्रमांक वर्ग 7 वा अर्णव विजय धोत्रे (केंद्रातून 1 ला) राज्यातून 5 वा क्रमांक, वर्ग 7 वा श्रीयश विनायक पाठक (केंद्रातून 4 था) राज्यातून 13 वा क्रमांक, वर्ग 7 वा स्वरा प्रफुल्ल भालतिलक (केंद्रातून 5 वी) राज्यातून 14 वा क्रमांक अशा या एकूण 19 विद्यार्थ्यांनी राज्यातून तसेच केंद्रातून गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केले आहे
. यामध्ये विशेषतः वर्ग 6 वी मधील तन्मय ताडे (केंद्रातून 1 ला) राज्यात 2 रा व वर्ग 7 वी मधील अर्णव धोत्रे (केंद्रातून 1 ला) राज्यात 5 वा यांनी उल्लेखनीय यश मिळवले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. अविनाश देव, संस्थेचे सचिव श्री. विश्वनाथ गद्रे, कार्यकारिणी सदस्य सौ. अनघाताई देव, ब्राह्मण सभा कार्यकारिणी सदस्य, शाळा समिती सदस्य, प्राथामिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. कीर्ती चोपडे, माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता जळमकर व शाळेतील सर्व शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.
👏 सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
