विदर्भस्तरीय फिल्मी गीत गायन स्पर्धेत विर बाजाड प्रथम!

सृजन म्युझिकल, वर्धा आणि जय महाकाली शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न स्व. लता मंगेशकर स्मृतिदिनानिमित्त आयोजित विदर्भस्तरीय खुली फिल्मीगीत गायन स्पर्धा “कराओके सुरांजली 2026” मध्ये ब्राह्मण सभा संचालित माझी बाल शाळा, जठारपेठ अकोला येथील विद्यार्थी विर बाजड याने बालगटातून उत्कृष्ट गायन सादर करत प्रथम क्रमांक पटकावला.
विद्यार्थ्याच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि पालकांनी त्याचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 🌸🎤