बाल शिवाजी शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा….

ब्राह्मण सभा अंतर्गत बाल शिवाजी शाळा, जठारपेठ अकोला येथे २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय नरेंद्र पाठक यांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस पौर्णिमा शांडिल्य यांनी संविधान उद्देशिकेचे प्रभावी वाचन केले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन कु. स्वरा मुरूमकर हिने केले, तर प्रास्ताविक वाचन सौ. वैशाली पाटील यांनी सादर केले. यावेळी वर्ग ८ वीच्या विद्यार्थ्यांनी डम्बेल्स कवायतीचे उत्कृष्ट सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. संविधान सभेतील महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या महिला सदस्या सरोजिनी नायडू यांच्या कार्याचा परिचय अधिराज मुरूमकार या विद्यार्थ्याने करून दिला. तसेच अद्वैत पांडे याने आजच्या विद्यार्थ्यांची जबाबदारी व कर्तव्ये या विषयावर प्रेरणादायी भाषण केले.
१९५० ते २०२५ या काळात भारताने साध्य केलेली प्रगतीची पावले या विषयावर वर्ग आठवीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेली नाटिका विशेष आकर्षण ठरली. बक्षीस वितरणाचे संचालन मीना मुरूमकर यांनी केले. या कार्यक्रमांमध्ये राष्ट्रीय स्तरावर व राज्य स्तरावर यशाची पताका फडकविणाऱ्या खेळाडूंचे, गणित प्रज्ञा परीक्षेत गोल्ड मेडल व सिल्वर मेडल प्राप्त विद्यार्थी तसेच विद्यार्थी विज्ञान मंथन स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष नरेंद्र पाठक व सहसचिव श्री नरेंद्र देशपांडे यांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरवण्यात आले. संविधान निर्मितीची रचना व विद्यार्थ्यांची कर्तव्ये याबद्दल कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री नरेंद्र पाठक सरांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला शाळा समिती सदस्या सौ. भक्ती बिडवई, कार्यकारणी सदस्या सौ. मोहिनी मोडक, माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता जळमकर, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका कीर्ती चोपडे, शिक्षक व सर्व कर्मचारी तसेच पालक उपस्थित होते.