बाल शिवाजी माध्यमिक शाळेत राष्ट्रीय युवा दिन आणि राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात संपन्न…..
बाल शिवाजी माध्यमिक शाळेत सोमवार दि. 12/01/2026 रोजी राजमाता जिजाऊ जयंती आणि राष्ट्रीय युवा दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमासाठी शाळेचे माजी विद्यार्थी तसेच कॅलक्युलस संस्थेचे संचालक मा. श्री. चेतन माहुलकर प्रमुख अतिथी म्हणून लाभले होते. राजमाता जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमापूजन आणि दीपप्रज्ज्वलनानंतर कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली याप्रसंगी आदित्य योगेश आवळे याने स्वामी विवेकानंदांचे कार्य विशद केले. श्रीविद्या करंडे हिने राजमाता जिजाऊ यांचे कार्यकर्तृत्व भाषणातून स्पष्ट केले. ईश्वरी तायडे हिने स्वामी विवेकानंदांच्या आयुष्यातील मानवतेचा संदेश देणारी कथा सांगितली. नेहा कराळे, शुभदा बिडवई, सौम्या महाजन, निलेश पाटील, सोहम बिडवई यांनी गीताद्वारे प्रस्तुत केली. तसेच वेदांत कुटे, पयोष्णी देशमुख यांनी अभिनयाद्वारे सादर केली या गीतासाठी अर्णव भांबेरे याने पेटीवर आणि सोहम देशपांडे याने तबल्यावर साथ संगत केली. प्रमुख अतिथी श्री चेतन माहुलकर यांनी “शाळेतील जिजाऊ समान शिक्षिकांचा आदर करा त्यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार स्वतःचे उज्ज्वल भविष्य घडवा आणि देशाचे जबाबदार नागरिक बना’,असे मत आपल्या भाषणातून व्यक्त केले.
संस्थेचे उपसचिव मा. श्री. नरेंद्र देशपांडे यांनी स्वामी विवेकानंदांसारखे विचारांनी मनाने, शरीराने ही सशक्त बना आणि जिजाऊंचा बाणेदारपणा अंगी बाळगा’ असे मत आपल्या भाषणातून व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ पूर्वा सोमण यांनी केले. तसेच प्रमुख अतिथींचा परिचय सौ निशा जोशी यांनी करून दिला.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन चिदंबर काळे याने केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रावी राऊत हिने केले या कार्यक्रमासाठी सौ रेणुका भाले, सौ स्वाती बापट यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव मा. श्री. मोहन गद्रे, कार्यकारणी सदस्य सौ. भक्ती बिडवई शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. जळमकर, शाळेच्या पर्यवेक्षिका सौ. रागिणी बक्षी व किरण मुरमकर तसेच सर्व विद्यार्थी, शिक्षिका, कर्मचारी व पालक वर्ग हजर होते.
