बाल शिवाजी शाळेच्या विद्यार्थ्यांचे उत्कृष्ट सादरीकरण
बाल शिवाजी शाळेच्या विद्यार्थ्यांनी कोठारी कॉन्व्हेंट आयोजित ब्रिजलाल बियाणी Inter School Science and Technology Meet मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले. Poster Making using an App व Science Meet या दोन्ही विभागांत विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर उत्कृष्ट सादरीकरण करून अनुक्रमे प्रथम क्रमांक पटकावले. प्रचिती चोरे, वसुंधरा रेवस्कर, आदित्य आवळे, आदिनाथ पुसेगावकर–आर्यन चांदूरकर तसेच आनंदी सरप–धनश्री चव्हाण यांनी आपल्या मॉडेल्स व पोस्टर्सद्वारे चमकदार कामगिरी केली. त्यांच्या मार्गदर्शक शिक्षिका सौ. पूर्वा सोमण व सौ. ज्योत्स्ना कानकिरण यांचेही कौतुक करण्यात आले. विजेत्यांना रोख पारितोषिक व प्रमाणपत्र, तर इतरांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. संस्थाध्यक्ष श्री. अविनाश देव, मुख्याध्यापिका संगीता जळमकर, कीर्ती चोपडे व कर्मचाऱ्यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले.
