माझी बाल शाळेत लेखनारंभ कार्यक्रम उत्साहात संपन्न

दि. २२ नोव्हेंबर २०२५ रोजी माझी बाल शाळेतील फुलवाडीचा लेखनारंभ कार्यक्रम सावरकर हॉलमध्ये उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाले. विद्यार्थ्यांनी गणपती श्लोकाचे सुंदर सादरीकरण केले. लेखनारंभ विधी पुरोहित किरण सुदामे यांच्या मंत्रोच्चारात पार पडला. पालकांनी पाटीपूजन करून मुलांना प्रथम अक्षरांची ओळख करून दिली.

प्रमुख अतिथी माजी मुख्याध्यापिका सौ. अंजली कडलासकर यांनी “मुलांना क्वालिटी टाईम देणे आवश्यक आहे,” असे सांगत पालकांना मार्गदर्शन केले. कार्यकारिणी सदस्या सौ. वैशाली देशपांडे व अध्यक्ष श्री. अविनाश देव यांनी मुलांच्या बालविकासातील पालकांच्या भूमिकेवर प्रकाश टाकला.

शेवटी विद्यार्थ्यांनी मान्यवरांसह रांगोळीवर ‘ॐ’ चिन्ह रेखाटून कार्यक्रमाला आध्यात्मिक स्पर्श दिला. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन शिक्षिका सौ. कल्याणी सुदामे यांनी केले. कार्यक्रमाला पालक व मान्यवरांची मोठी उपस्थिती लाभली.