एम.टी.एस. ( जळगांव ) परीक्षेत बाल शिवाजी शाळेचे सुयश

एम टी एस जळगांव यांच्या तर्फे २०२०-२०२१ या सत्रात घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत स्थानिक बाल शिवाजी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त करून अकोल्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. वर्ग ७ वी ची  संस्कृती विनायक पाठक हिने अकोला केंद्रातून प्रथम क्रमांक व राज्यातून व्दितीय क्रमांक प्राप्त केला आहे. तसेच या परीक्षेत अकोला केंद्रातून वर्ग २ री तील प्रथमेश दिनेश भटकर प्रथम क्रमांक, वरदा विक्रांत कुळकर्णी व्दितीय क्रमांक, सर्वस्वी पुरुषोत्तम शेळके तृतीय क्रमांक, वर्ग ३ री तील स्वर्णाभ गुंजन लांडगे प्रथम क्रमांक, वर्ग ४ थी ची राजस्वी नारायण शेगोकार व्दितीय क्रमांक, वर्ग ६ वी ची शुभम सुधीर मिसुरकर व्दितीय क्रमांक, समृद्धी हरिश्चंद्र काळंके तृतीय क्रमांक,वर्ग ७ वा युवराज आनंद गोदे व्दितीय क्रमांक, सोहम भिवटे तृतीय क्रमांक या विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केले आहे. सर्व यशस्वी  विद्यार्थ्यांचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.अविनाश देव, संस्थेचे सचिव श्री.विश्वनाथ गद्रे,कार्यकारिणी सदस्य सौ. अनघाताई देव,ब्राह्मण सभा कार्यकारिणी सदस्य, सर्व शाळा समिती सदस्य, प्राथामिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.कीर्ती चोपडे, माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.संगीता जळमकर व शाळेतील सर्व शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.