🏫मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा….
ब्राह्मण सभा संचालित बाल शिवाजी शाळा, जठारपेठ, अकोला. येथे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त वर्ग १ ते ९ पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी विविध शालेय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेबद्दल अभिमान व प्रेम निर्माण झाले.
स्पर्धांचा तपशील पुढीलप्रमाणे —
🔹वर्ग पहिली –‘जीवेची वळकटी’ स्पर्धा
🔹वर्ग दुसरी –हस्ताक्षर स्पर्धा
🔹वर्ग तिसरी – मुळाक्षरांवरून जास्तीत जास्त शब्दलेखन स्पर्धा
🔹वर्ग चौथी – ‘ओळखा पाहू’ स्पर्धा
🔹वर्ग पाचवी – दोन मिनिटांत जास्तीत जास्त म्हणी लेखन स्पर्धा
🔹वर्ग सहावी – नाट्यछटा सादरीकरण स्पर्धा
🔹वर्ग सातवी – कथाकथन स्पर्धा
🔹वर्ग आठवी – वाचनवेगस्पर्धा
🔹वर्ग नववी – नाट्यछटा लेखन स्पर्धा
प्रत्येक वर्गातून सहभागी विद्यार्थ्यांपैकी प्रथम असे तीन क्रमांक काढण्यात आले. विजेत्या विद्यार्थ्यांना साभिनंदन प्रशस्तीपत्र देण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या भाषिक कौशल्यांना चालना मिळाली असून मराठी भाषेची गोडी व अभिमान अधिक दृढ झाला. बाल शिवाजी परिवारातर्फे यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. 🌸
