७४ वा प्रजासत्ताक दिन सोहळा बाल शिवाजी शाळेत उत्साहात संपन्न.
जठारपेठ स्थित बाल शिवाजी शाळेत ७४ वा प्रजासत्ताक दिन सोहळा उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री. अविनाश देव यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. राष्ट्रगीताने उपस्थित सर्वांनी तिरंग्याला मानवंदना दिली. यावेळी संविधान उद्देशिकेचे वाचन सौ.अपेक्षा आवळे यांनी केले. शाळेतील विद्यार्थ्यांनी ‘हा देश माझा याचे भान’ हे समुहगीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. किरण झटाले यांनी केले. वर्ग ८ वी च्या विद्यार्थ्यांच्या लेझिम पथकाने उत्कृष्ट सादरीकरण केले. ‘India is an emerging super power’ हे इंग्रजी भाषण अंजली कराळे हिने तर ‘गाऊ भारत मातेची गाणी ‘ ही स्वरचित कविता कार्तिक भावसार याने सादर केली. २६ जानेवारी चे महत्त्व शर्वरी काटे हिने आपल्या भाषणातून मांडले. ‘आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षाचे महत्त्व ‘ सर्वज्ञ मशानकर, वेदश्री जोशी या विद्यार्थ्यांनी विशद केले. अर्पिता ढोरे , गार्गी गाडगीळ, आरोही महाशब्दे, वैष्णवी लोहित, आनंदी देशमुख, अथर्व ढोरे, साईराम साखरकर, रोहन बेले, पार्थ राऊत, श्रीहरी राऊत या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतमाला उत्तमरित्या सादर केली.
त्यानंतर पूर्व माध्यमिक ( इ.८ वी ) शिष्यवृत्ती परीक्षेत संस्कृती विनायक पाठक हिने जिल्ह्यातून १ ली तर राज्यातून १० वी येण्याचा बहुमान मिळवला यावेळी तिला पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. Wishdom तर्फे आयोजित गणित स्पर्धेत राजस्वी नारायण शेगोकार वर्ग ५ वा राज्यातून प्रथम, Wishdom तर्फे आयोजित विज्ञान स्पर्धेत श्रीयश विनायक पाठक, अभिराज प्रवीण ढोरे, अर्णव रविंद्र भांबेरे, पियुषा राजेश भोंडे, निर्मिती संतोष हाडोळे, राजस्वी नारायण शेगोकार, समृद्धी हरिश्चंद्र काळंके, अंजली अजय कराळे या यशस्वी विद्यार्थ्यांना याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री. अविनाश देव,संस्थेचे सचिव श्री. मोहन गद्रे यांच्या शुभहस्ते पारितोषिके व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच टेनिस बॉल क्रिकेट या खेळात विभागीय स्तरावर उपविजेता ठरलेल्या चमूतील कर्णधार अथर्व भांबेरे सह १३ क्रिकेटवीरांचा पदक देऊन सन्मान करण्यात आला. या बक्षिस वितरणाचे संचालन सौ. रश्मी जोशी यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष श्री. अविनाश देव यांनी जागतिक पातळीवर भारताने केलेली प्रगती आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद आहे. ही प्रगती उत्तरोत्तर वाढत रहावी यासाठी विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे व सातत्याने अभ्यास करून आपले योगदान द्यावे हाच गणतंत्रदिनी निश्चय करा असे विचार याप्रसंगी व्यक्त केले.
या कार्यक्रमाला संस्थेचे सचिव श्री. मोहन गद्रे, शाळा समिती सदस्य श्री. नरेन निखाडे, डॉ. जयंत म्हैसने,श्री. महेश कोतेगावकर, माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता जळमकर, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्ती चोपडे, शिक्षक वृंद, विद्यार्थी, पालकवर्ग व कर्मचारी उपस्थित होते. या बहारदार कार्यक्रमाचे संचालन गिरीश निकम याने केले. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम ने झाली.