स्व. अण्णासाहेब देव स्मृती प्रित्यर्थ आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न 🗣️✨
स्थानिक जठारपेठ येथील ब्राह्मण सभा अकोला संचालित बाल शिवाजी प्राथमिक शाळेत शनिवार, दिनांक 7 फेब्रुवारी 2025 रोजी शाळेचे संस्थापक स्व. अण्णासाहेब देव स्मृती प्रित्यर्थ इयत्ता ५ ते ७ साठी आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात स्व. अण्णासाहेब देव यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. प्रास्ताविक सौ. रश्मी जोशी यांनी केले. शहरातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
‘आजच्या विद्यार्थ्याची जबाबदारी’ या विषयावर विद्यार्थ्यांनी प्रभावी विचार मांडले. परीक्षक म्हणून मा. श्री अमित बाजारे व डॉ. पुनम मानकर पिसे यांनी काम पाहिले.
🏆 पारितोषिक विजेते :
🥇 प्रथम : आनंदी मोडक (प्रभात किड्स, अकोला)
🥈 द्वितीय : रुपश्री दिनेश पांडव (बाल शिवाजी प्राथमिक शाळा)
🎖️ उत्तेजनार्थ : जिगीषा विशाल काटोले
यशस्वी विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.
कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष मा. श्री अविनाश देव, कार्यकारिणी सदस्य, मुख्याध्यापिका, शिक्षकवृंद, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन श्रद्धा रेलकर यांनी केले व कार्यक्रमाची सांगता एकात्मता मंत्राने झाली.
