‘संस्कृत हे साध्य नाही तर प्राचीन ज्ञानापर्यंत पोहोचवण्याचे साधन आहे’ मा. डॉ. प्राची पिंपरकर…..
संस्कृत दिन व क्रांती दिन आणि नारळी पौर्णिमा या त्रिवेणी संगमाचे औचित्य साधून बाल शिवाजी शाळेत विविध कार्यक्रम सादर करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मा. डॉ. प्राची पिंपरकर उपस्थित होत्या.
दीप प्रज्ज्वलन आणि प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.संगीता जळमकर यांनी प्रमुख अतिथींचे स्वागत केले. संस्कृत भाषेचे ऋषिमुनींच्या योगदानाचे महत्त्व संस्कृत गीतातून इयत्ता आठवीच्या ओम शेकोकार, अर्णव भांबेरे, शांभवी सुदामे, पियुशा भोंडे, कल्याणी पांडे, अन्वी बराटे या आठवीच्या विद्यार्थ्यांनी सादर केले. त्यानंतर क्रांतिकारक भगतसिंग यांचे स्वगत स्वर्णाभ लांडगे याने, क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचे मनोगत सोहम देशपांडे याने, प्रीतीलता वड्डेदार हिचे मनोगत वसुंधरा रेवस्कर हिने, गोपाळ कृष्ण गोखले यांचे मनोगत परीक्षित काळणे याने सादर केले. राणी कर्णावतीची रक्षाबंधनाची कथा कु. दिव्या चांडक हिने सादर केली.
संस्कृत दिनाच्या निमित्ताने शाळेत विविध स्पर्धांचे आयोजन विद्यार्थ्यांसाठी करण्यात आले होते. इयत्ता एक ते चार साठी विष्णुसहस्रनाम पठण स्पर्धा आयोजित करण्यात आली तसेच इयत्ता पाचवी ते सातवी साठी स्मरणशक्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमुख अतिथींच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले त्यात गट अ प्रथम क्रमांक शांभवी शैलेश कुळकर्णी, द्वितीय क्रमांक अमृता सचिन कराळे, गट ब प्रथम क्रमांक श्रावणी निलेश नावकर, द्वितीय क्रमांक आरुषी सचिन गुरव, गट तीन क प्रथम क्रमांक रेयांशी सचिन कान्हे, द्वितीय क्रमांक रोहिणी गणेश रौंदळे या विद्यार्थ्यांना प्रमुख अतिथींच्या हस्ते पुरस्कृत करण्यात आले.
सौ. वैशाली पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रमुख अतिथींचा परिचय सौ.स्वाती बापट यांनी केला माननीय प्राची पिंपरकर यांनी आपल्या भाषणातून ‘संस्कृत भाषा ही देशभक्तीचे प्रतीक आहे, मुळात संस्कृत भाषा आपल्या संस्कृतीचे मूळ उगम आहे. संस्कृत दिन विद्यालयात सादर करणे एवढ्यापुरत्याच महत्त्वाचे नाही तर, संस्कृतचे संवर्धन करणे आवश्यक आहे. कारण संस्कृती साध्य नाही तर, साधन आहे प्राचीन ज्ञानापर्यंत पोहोचवण्याचे ते साधन असल्याने आपण संस्कृत चिरंतन वृद्धिंगत ठेवली पाहिजे’.विचार व्यक्त केलेत. आभार प्रदर्शन सौ. अपर्णा बोराखडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेवती देशपांडे हिने केले.
संपूर्ण कार्यक्रम संस्कृत भाषेत सादर करण्यात आला.
संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.अविनाश देव, संस्थेचे सचिव मा.श्री. मोहन गद्रे, शाळा समिती सदस्य, मुख्याध्यापिका, शिक्षिका, विद्यार्थी तसेच पालक उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता एकात्मता मंत्राने करण्यात आली.
