बाल शिवाजी शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न 

0 अमृत महोत्सव वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

स्थानिक जठारपेठ येथील ब्राह्मण सभा शिक्षण संकुलांतर्गत बाल शिवाजी शाळेत अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न झाला.  माध्यमिक  शालान्त परीक्षेत  शाळेतून प्रथम  येण्याचा बहुमान प्राप्त करणारा चि. समर्थ प्रमोद जोशी  याच्या  हस्ते  ध्वजारोहण करण्यात आले. 

त्यानंतर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी स्वा.सावरकर रचित जयोस्तुते… हे समूहगीत सादर केले. स्वातंत्र्यलढ्यातील बाल हुतात्मा शंकर व शंभूनारायण यांच्या विषयी युगंधर पाकदुने याने माहिती सांगितली. तसेच स्वातंत्र्यलढ्यातील आंध्र प्रदेशातील क्रांतिकारी अल्लुरी सिताराम राजू यांच्या क्रांती कार्याविषयी माहिती आयुष जळमकर ह्याने आपल्या इंग्रजी भाषणातून सांगितली.  नागालँडची वीरबाला-राणी गाइदिन्ल्यू च्या कार्याबद्दल माहिती कु. रेणुका गोगरकर हिने  सांगितली.  वर्ग ७ वीच्या काही विद्यार्थ्यांनी ‘रक्ताने लिहुनी गाथा’ हे समूहगीत सादर केले.या प्रसंगी समर्थ ने आपले मनोगत मांडले व शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त केली. देशाच्या स्वातंत्र्यदिनी  संस्थेचे अध्यक्ष  श्री. अविनाश देव यांनी ‘ आपली शैक्षणिक प्रगती साधून देशसेवेला हातभार लावावा ‘  असे आवाहन विद्यार्थ्यांना केले. 

या  कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष श्री. अविनाश देव, संस्थेच्या सह सचिव सौ. वैशाली देशपांडे, कार्यकारिणी सदस्य सौ. अनघाताई देव,  श्री. नरेंद्र देशपांडे, शाळा समिती सदस्य श्री. नरेन निखाडे, डॉ. जयंत म्हैसने,  श्री. महेश कोतेगावकर, सौ. रेणुका भाले, मा. निलेश देव, प्राथामिक शाळेच्या  मुख्याध्यापिका सौ.कीर्ती चोपडे, माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.संगीता जळमकर व शाळेतील सर्व शिक्षिका, पालकवर्ग  व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कस्तुरी देशपांडे हिने  केले. तर प्रास्ताविक सौ. शितल थोडगे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम ने झाली.   

0 देशाला स्वातंत्र्य प्राप्त होऊन ७५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे शहरातील स्वातंत्र्य सेनानींच्या स्वातंत्र्य लढ्यातील अमूल्य योगदानाची माहिती तथा त्यांची ओळख होण्यासाठी ७५ स्वातंत्र्य सैनिकांचे रेखाचित्र व माहिती प्रदर्शनी शाळेत या निमीत्ताने आयोजित केली आहे. स्वतंत्र दिनाचे औचित्य साधून शाळेतील विद्यार्थी व पालकांनी या स्वतंत्रवीरांना श्रद्धांजली अर्पण केली. 


0 शाळेतर्फे  आंतरशालेय राष्ट्रभक्तीपर गीत गायन स्पर्धा  13 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली. त्या मध्ये १९ शाळा सहभागी झाल्या होत्या.  ‘अ’ गटामध्ये प्रथम क्रमांक  –  लिटील स्टार कॉन्व्हेंट,व्दितीय क्रमांक समर्थ पब्लिक स्कूल व उत्तेजनार्थ पारितोषिक हिन्दू ज्ञानपीठ या शाळेने पटकावले. ‘ब’  गटामध्ये प्रथम क्रमांक – प्रभात किड्स स्कुल, व्दितीय क्रमांक कोठारी कॉन्व्हेंट व उत्तेजनार्थ पारितोषिक SOS  या शाळेने प्राप्त केले. तसेच शाळेत वर्गवार स्पर्धा घेण्यात आल्या.  वर्ग १ ते १० च्या विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.