बाल शिवाजी शाळेत विद्यार्थी सुरक्षा समितीची बैठक संपन्न……

ब्राह्मण सभा संचालित बाल शिवाजी प्राथमिक व माध्यमिक शाळेत दि. 30/12/2025 सोमवार रोजी बाल शिवाजी स्वा. सावरकर सभागृहात विद्यार्थी सुरक्षा समितीची बैठक उत्साहात पार पडली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या सभेस पोलीस निरीक्षक, सिव्हिल लाईन, मा. मालती कायटे मॅडम प्रमुख वक्त्या व मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या.

प्रमुख अतिथी व उद्बोधनकर्त्या म्हणून लाभलेल्या मा. मालती कायटे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना स्वतःच्या सुरक्षिततेबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. बालवयात विद्यार्थ्यांनी आपल्या सुरक्षिततेची कशी काळजी घ्यावी, विद्यार्थ्यांची वागणूक कशी असावी, तसेच अनोळखी व्यक्तींशी वागताना कोणती दक्षता घ्यावी, हे त्यांनी सोप्या उदाहरणांद्वारे स्पष्ट केले.

यावेळी केंद्रप्रमुख श्री. नितीन बंडावार यांनी विद्यार्थ्यांना पॉस्को कायदा (बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा) याविषयी माहिती दिली. तसेच अज्ञात व्यक्तींपासून असणारे धोके, शाळेत बसविण्यात आलेल्या सुरक्षा कॅमेऱ्यांचे महत्त्व, तक्रार पेटीचा योग्य वापर, तक्रार नोंदविण्याचे महत्त्व व चाइल्ड हेल्पलाइन चा वापर कसा करावा याबाबत मार्गदर्शन केले. या विद्यार्थी सुरक्षा समितीच्या सभेमुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वसुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण झाली. या कार्यक्रमाला संस्थेचे सचिव मा. श्री. मोहन गद्रे बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता जळमकर, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका कीर्ती चोपडे तसेच सर्व शिक्षिका, कर्मचारी हजर होते. कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.