बाल शिवाजी शाळेत ‘आविष्कार’ स्नेहसंमेलन जल्लोषात संपन्न
ब्राह्मण सभा अकोला संचालित बाल शिवाजी शाळेत ‘आविष्कार’ स्नेहसंमेलन उत्साहात व जल्लोषात पार पडले. संस्थेच्या कार्यकारिणी सदस्या सौ.अनघा देव व माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता जळमकर, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्ती चोपडे यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. सकाळच्या सत्राची सुरुवात ‘देवा श्रीगणेशा ……’ ह्या गणपती बाप्पाच्या गाण्याने झाली. फुलवाडी ते तिसरी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारची नृत्य सादर केलीत. वर्ग ३ च्या विद्यार्थ्यांनी ‘श्रीकृष्णाचे दहा अवतार ‘ ही मराठी नाटिका उत्कृष्टपणे सादर केली. अमृता सुरे व अर्जुन दिवेकर या वर्ग ४ च्या विद्यार्थिनींनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तम केले. दुपारच्या सत्राची सुरुवात श्री गणरायाच्या जय जयकाराने करण्यात आली. वर्ग ४ ते ९ च्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची बहारदार नृत्य सादर केलीत, तसेच ‘Clean India’ ही इंग्रजी नाटिका,’ सोशल मिडिया ‘ ही हिंदी नाटिका,’ राक्षसराज ‘ ही धम्माल विनोदी मराठी नाटिका सादर केली. ‘रामसेतू’ (रेडियम) हे नृत्य कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. या कार्यक्रमामध्ये २०२१-२२ या सत्रातील इयत्ता १० वी तील गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. समर्थ प्रमोद जोशी, स्वरांजली शिरीष कडू, ओजस श्रीकांत जोशी, क्षितिजा पंकज देशमुख, मधुरा प्रदिप किडिले या विद्यार्थ्यांना पदवीधर मतदार संघाचे आमदार मा.श्री. रणजीतजी पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ. सौ. अपर्णा पाटील यांच्या हस्ते रोख पारितोषिक व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक या स्पर्धेत आयुष गजानन जळमकर, श्रीप्रसाद पंकज देशमुख व कृष्णा अविनाश बोर्डे, भक्ती मनिष मेन, सर्वेश अतुल बकाल, चैतन्य विश्वभर माळी यांनी उत्तम यश संपादन केले. तसेच गणित प्रज्ञा परीक्षेत आयुष गजानन जळमकर, संस्कृती विनायक पाठक, राजस्वी नारायण शेगोकार, कृष्णा अविनाश बोर्डे या परीक्षांमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. तसेच महाराष्ट्र टॅलेन्ट सर्च परीक्षा, जळगांव, तन्मय सचिन ताडे, गार्गी पराग देशमुख, श्रीयश विनायक पाठक, समृद्धी हरीश्चंद्र काळंके हे विद्यार्थी राज्यातून दुसरे आले असून अधिराज मंगेश मुरुमकार हा राज्यातून तिसरा आहे. खंडेलवाल इंग्लिश स्कूल तर्फे विज्ञान प्रश्नमंजुषेत पियुषा राजेश भोंडे, अधिराज मंगेश मुरुमकार हे प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत. स्व. दि. वा. फडणविस स्मृती प्रित्यर्थ गीत गायन स्पर्धेत राज्यातून व्दितीय आलेली गिरीजा प्रसाद रानडे याच स्पर्धेत अवनी किरण देशपांडे हिने उत्कृष्ट सादरीकरण केले. या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते यांचे कौतुक करण्यात आले.
शाळेच्या पालक वाचनालयातर्फे पालकांसाठी तसेच पालक शिक्षिकांसाठी आयोजित निबंध लेखन स्पर्धेच्या विजेत्यांना यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री.अविनाश देव व सहसचिव सौ.वैशाली देशपांडे यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. नर्सरी ते वर्ग ५ वी च्या पालकांसाठी आयोजित ‘ऑनलाईन शिक्षणातून झालेले फायदे व तोटे ‘ या विषयावरील निबंध स्पर्धेत सौ. विद्या घाईट यांना प्रथम क्रमांक व सौ. प्रिया रौंदळे यांना व्दितीय क्रमांक तसेच पालक शिक्षिका मधून सौ. रागिणी बक्षी यांना प्रथम व सौ. निलीमा चव्हाण यांना व्दितीय क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले. ‘अज्ञात क्रांतिकारक ‘ या विषयावर शिक्षिका प्राथमिक गटातून आयोजित स्पर्धेत सौ. अश्विनी पांडे यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. वर्ग ६ ते १० वी च्या पालकांसाठी ‘लॉकडाऊन नंतरचा विद्यार्थी व आम्ही पालक ‘ या विषयावरील निबंधासाठी सौ. जयश्री साखरकर यांना प्रथम ,सौ. अश्विनी देशमुख व पुनम उपश्याम यांना व्दितीय क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले. तसेच पालक शिक्षिका सौ. किर्ती खपली यांना प्रथम, सौ. साक्षी सहस्त्रबुद्धे यांना व्दितीय क्रमांकाची पारितोषिके प्रदान करण्यात आली. याप्रसंगी सूत्रसंचालन सहशिक्षिका शुभांगी तिडके यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्ग १० च्या कांचन कवडे, गौरी कुळकर्णी, जान्हवी शिवरकर, रुद्रा वानखेडकर, साहिल कुळकर्णी, पलाश भालेराव, नचिकेत सहस्त्रबुद्धे, कृष्णा बोर्डे या विद्यार्थ्यांनी केले. या कार्यक्रमांसाठी संस्थेचे अध्यक्ष श्री. अविनाश देव, कार्यकारिणी सदस्य सौ. अनघा देव सौ. वैजयंती पाठक, श्री. नरेंद्र देशपांडे, शाळा समिती सदस्य व इतर मान्यवर, सर्व शिक्षिका, विद्यार्थी व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.