बाल शिवाजी शाळेत ‘आविष्कार’ वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न


ब्राह्मण सभा अकोला संचालित बाल शिवाजी शाळेत ‘आविष्कार’ वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. संस्थेचे अध्यक्ष अविनाश देव, सचिव मोहन गद्रे, कार्यकारिणी सदस्य अनघा देव तसेच शाळेच्या मुख्याध्यापिकांच्या हस्ते सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
विद्यार्थ्यांनी सादर केलेली नृत्ये, इंग्रजी व मराठी नाटिका यांना उपस्थितांची भरभरून दाद मिळाली. दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. पालक व शिक्षकांसाठी घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील विजेत्यांनाही पारितोषिके देण्यात आली.
प्रमुख अतिथी मा. श्री. नितीनजी बाठे यांनी विद्यार्थ्यांना वेळेचे नियोजन व परिश्रमाचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनास पालकवर्गाची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.