बाल शिवाजी शाळेच्या बालवैज्ञानिकांची अंतिम फेरीत निवड…..

ब्राह्मण सभा संचालित बाल शिवाजी शाळा, जठारपेठ, अकोला येथील इयत्ता 6 वीतील तन्मय सचिन ताडे, अवनिश मुकेश नीचळ तसेच वर्ग 9 वी चा आदिनाथ श्रीपाद पुसेगावकर व राजश्री नारायण शेगोकार यांची मुंबई विज्ञान अध्यापक मंडळाद्वारे घेण्यात येणाऱ्या डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेच्या प्रात्यक्षिक परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन करत अंतिम फेरीतील प्रकल्प सादरीकरणासाठी निवड झाली आहे. सत्र 2025 – 26 चा वर्ग 9 वी आणि 6 वी चे प्रकल्प सादरीकरण 15 मार्च रोजी मुंबई येथे होणार आहे. या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे व मार्गदर्शक शिक्षिका यांचे संस्थेचे अध्यक्ष अविनाश देव, सचिव मोहन गद्रे, कार्यकारिणी सदस्य अनघा देव, शाळा समिती सदस्य, बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता जळमकर, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका कीर्ती चोपडे तसेच शिक्षक व कर्मचारीवर्ग यांनी मनःपूर्वक कौतुक केले.