बाल शिवाजी शाळेच्या आजी आजोबा मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

बाल शिवाजी शाळेच्या प्रांगणात २४/०२/२४ रोजी सकाळी ८. ३० वा. आजी-आजोबा मेळावा’ उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख अतिथी ‘ब्राहमण सभा ‘ संस्थेचे अध्यक्ष मा. श्री अविनाश देव आणि ब्राहमण सभा संस्थेच्या कार्यकारिणी सदस्या सौ. अनघाताई देव हे आजी आजोबा लाभले. सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी KG । च्या विद्यार्थीनींनी सरस्वती वंदना सादर केली. मेळाव्यात सर्वप्रथम आजी-आजोंबासाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. स्मरणशक्ती स्पर्धेत श्री. सुरेश गासे या आजोबांनी बक्षिस मिळविले. ‘straw’ नेबॉल उचलणे” हया स्पर्धेत पुंडलिक उंबरकार आजोबा विजेते ठरले. ‘सराटयाने पत्ते उचलणे’ या स्पर्धेत नलिनी ठाकरे हया आजीने प्रथम क्रमांक पटकाविला. ‘सहजोडी मनोरा रचणे’ ह्या स्पर्धेत रमेश नागे  आजोबा व सुशिला नागे ह्या आजी यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. ‘संगीत खूर्ची  ‘ स्पर्धेत ज्योती देशमुख आजी विजेत्या ठरल्या. सर्व विजयी स्पर्धकांना प्रमुख अतिथी यांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली. हयानंतर प्रश्नावलीचे उत्तम लेखन करणाऱ्या मुकुंद उमरीकर आजोबा व श्री सुरेश विधळे आजोबा हयांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. श्री सुरेश विधळे आजोबा श्रीमती छाया मानोरकर आजी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. अविनाश देव यांनी गोष्टीरुपाने आणि भावी पिढीला घडविण्यासाठी आजी आजोबांचे विशेष योगदान असावे तसेच  अभ्यासाबरोबर विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागूणांचा विकास करण्यासाठी शाळा नेहमी कटीबद्ध असते असे मत व्यक्त केले. 

या कार्यक्रमास बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता जळमकर तसेच बाल शिवाजी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका किर्ती चोपडे, पर्यवेक्षिकासौ.रागिणी बक्षी या उपस्थित होत्या, माझी बाळ शाळेच्या पर्यवेक्षिका सौ. भारती कुळकर्णी यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्तविक  केले. कार्यक्रमाचे  प्रास्ताविक सौ भारती कुळकर्णी  तर संचलन व  आभार प्रदर्शन सौ. प्रांजली जैन यांनी केले. अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली.