बाल शिवाजी शाळेची माध्यमिक शालांत परीक्षेत उत्तुंग भरारी

Covid – 19 च्या प्रादुर्भावामुळे SSC बोर्डाने घेतलेल्या निर्णयानुसार विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यात आले होते.  इयत्ता ९ वी चे ५०% गुण व इयत्ता १० वी  चे ५० % निर्धारित केलेल्या  गुणदान पद्धतीनुसार निकाल घोषित करण्यात आला. स्थानिक जठारपेठ स्थित बाल शिवाजी माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी दरवर्षी प्रमाणे या वर्षीही घवघवीत यश प्राप्त केले असून  सलग २० वर्षांपासून शाळेने १००% निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.  ऋचा अनंत देशपांडे हिने सर्वाधिक ९९. ८० % गुण मिळवून शाळेत प्रथम येण्याचा मान मिळवला. तसेच मानसी महेश डाबरे ९७. ६०%  गुण मिळवून शाळेत व्दितीय तर  शर्वरी विनायक जामकर ९७.२० %   गुण मिळवून शाळेतून तृतीय आली तर आदित्य प्रकाश चतरकर ९७.००%  हा चौथा तर साक्षी नरेंद्र कराळे ९६. ६०% गुण प्राप्त करून आपले  पाचव्या क्रमांकाचे  स्थान प्राप्त केले आहे.   गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.अविनाश देव, संस्थेचे सचिव श्री.विश्वनाथ गद्रे,कार्यकारिणी सदस्य सौ. अनघाताई देव,ब्राह्मण सभा कार्यकारिणी सदस्य, सर्व शाळा समिती सदस्य, माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.संगीता जळमकर, प्राथामिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.कीर्ती चोपडे  व शाळेतील सर्व शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.