बाल शिवाजी माध्यमिक शाळेचे मॉडेलची ठरले अव्वल
अकोला जिल्ह्यातील पारस येथील औष्णिक विद्युत केंद्राच्या ५८ व्या वर्धापन दिनानिमित्य मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स या विषयावर विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. त्यामध्ये अकोला, पारस, तेल्हारा, अकोट, बुलढाणा, वाशिम येथून विविध शाळा, ITI college चे विद्यार्थी सहभागी झाले होते . त्यात अकोल्यातील बाल शिवाजी माध्यमिक शाळेचे मॉडेल शाळास्तरावर अव्वल ठरले. बाल शिवाजी शाळेचे वर्ग ९ वीचे ओम दत्तात्रय सोनोने, सार्थक राजेंद्र खरोटे, तनिष्क विश्वास पाटील, कौशिक राहुल जोशी, श्रेयस विवेक पाटील या विद्यार्थ्यांनी coin sorting and counting machine चे मॉडेलचे प्रात्यक्षिक उत्तमरित्या सादर करून प्रथम क्रमांक पटकावला. या विद्यार्थांना सौ. सुनीता कोरडे यांनी मार्गदर्शन केले. यशस्वी चमूचे संस्थेचे अध्यक्ष श्री.अविनाश देव, सचिव श्री. मोहन गद्रे,कार्यकारिणी सदस्य सौ. अनघाताई देव, शाळा समिती सदस्य, मुख्याध्यापिका सौ. संगिता जळमकर, सौ.किर्ती चोपडे व सौ. भारती कुळकर्णी, शिक्षकवृंद व कर्मचारी वर्ग यांनी कौतुक केले.