बाल शिवाजी प्राथमिक शाळेचा इन्कस्पायर हस्ताक्षर स्पर्धेत उल्लेखनीय सहभाग…..

अकोला येथील प्रभास किड्स स्कूल येथे दिनांक १९ जानेवारी २०२६ रोजी आयोजित आंतरशालेय इन्कस्पायर हस्ताक्षर स्पर्धेत बाल शिवाजी प्राथमिक शाळा जठारपेठ अकोला येथील विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवित उल्लेखनीय कामगिरी केली.

या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सुंदर, स्वच्छ व शिस्तबद्ध हस्ताक्षर सादर करून परीक्षकांचे लक्ष वेधून घेतले. स्पर्धेत वर्ग 3 रीची अपेक्षा सुनील म्हैसने हिने द्वितीय क्रमांक पटकाविला, तर ख्याती जयंत अरुडकर वर्ग २ रा हिला उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले.

विद्यार्थ्यांच्या या यशामागे शाळेतील शिक्षिकांचे योग्य मार्गदर्शन व सातत्यपूर्ण सराव महत्त्वाचा ठरला. विद्यार्थिनींच्या या यशस्वी सहभागाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच पालकांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.