बाल शिवाजी प्राथमिक शाळेत पर्यावरणपूरक प्रवेशोत्सव
बाल शिवाजी प्राथमिक शाळा, जठारपेठ येथे 23 जून 2025 रोजी नवीन शैक्षणिक वर्षाच्या स्वागतार्थ पर्यावरणपूरक प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांचे टाळ्यांच्या गजरात, फुलांनी व ओवाळून स्वागत करण्यात आले. शाळा फुगे, रांगोळ्या व स्वागतद्वाराने सजवण्यात आली होती.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. रांगोळीत ‘ॐ’ काढून विद्यार्थ्यांनी सरस्वतीचे आशीर्वाद घेतले. Adop Tree Foundation मार्फत रोपांचे वाटप करण्यात आले. शाळेचे सचिव श्री. मोहन गद्रे, डॉ. संतोष सोमाणी आदी मान्यवरांच्या हस्ते रोपे देण्यात आली.
झाडांचे संगोपन, पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. या उपक्रमात पालकांनीही सहभाग घेतला. प्रमुख उपस्थितीत मुख्याध्यापिका किर्ती चोपडे, संगीता जळमकर, भारती कुलकर्णी व किरण मुरूमकार होत्या.
