बाल शिवाजी प्राथमिक शाळेची चमू आंतरशालेय विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेत अव्वल….
स्व.शंकरलालजी यांच्या स्मृति प्रित्यर्थ, खंडेलवाल इंग्लिश प्रायमरी स्कूल व कुतूहल संस्कार केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी आयोजित सायन्स मीट मध्ये वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन केले जाते. अकोल्यातील तसेच अकोल्या बाहेरील अनेक शाळांनी स्पर्धेत सहभाग घेतला. त्यामध्ये सर्वोत्तम आठ चमूंची सायन्स क्विझ या स्पर्धेसाठी प्रथम निवड करण्यात आली. त्यानंतर पुढील आठ चमुंच्या पाच फेऱ्या मंचावर सादर करण्यात आल्या. त्यात वर्ग चौथीचा वरद पियुष गंगाखेडकर आणि पार्थ विक्रम घाईट यांच्या चमूने प्रथम क्रमांक पटकविला. त्यामध्ये चार हजार किमतीची भेट वस्तू, गणपती ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्र असे बक्षीसांचे स्वरूप होते. सलग दुसऱ्यांदा या बक्षीसांचे पहिले मानकरी ठरण्यासमान बाल शिवाजी शाळेला मिळाला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व पालकांचे तसेच मार्गदर्शक शिक्षिकांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन!!!!!
