पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत बाल शिवाजी माध्यमिक शाळेची दैदिप्यमान कामगिरी…
वसुंधरा रेवस्कर राज्यात ८ वी; विदर्भ व अकोला जिल्ह्यात प्रथम, २४ विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश
अकोला : ब्राह्मण सभा संचलित बाल शिवाजी माध्यमिक शाळा, जठारपेठ, अकोला येथील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे आयोजित इयत्ता ८ वी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (PSS) २०२५–२६ मध्ये घवघवीत यश संपादन करत शाळेच्या गुणवत्तापूर्ण शैक्षणिक परंपरेत आणखी एका मानाच्या पर्वाची भर घातली आहे.
या परीक्षेत कु. वसुंधरा प्रकाश रेवस्कर हिने राज्यात ८ वा क्रमांक, तसेच विदर्भ विभाग आणि अकोला जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
याशिवाय अर्णव रविंद्र भांबेरे (जिल्ह्यात २ रा), पियुषा राजेश भोंडे (४ थी), अधिराज मंगेश मुरूमकार (५ वा), निर्मिती संतोष हाडोळे (६ वी), अर्णव नंदकिशोर सोनोने (१० वा), स्वर्णाभ गुंजन लांडगे (१४ वा), ओम संतोष शेकोकार (१६ वा), दिव्या कमलकिशोर चांडक (१७ वी), आर्यन राजकुमार चांदूरकर (१९ वा), आराध्या शरद धनी (२१ वी), आराध्या राहुल देशमुख (२६ वी), जय संदीप पारसकर (२७ वा), अंशुमन धनंजय धोत्रे (३३ वा), तनुश्री धनंजय चव्हाण (४२ वी), श्रीजित शंकर मोकळकर (४३ वा), कल्याणी राम पांडे (४४ वी), अनिरुद्ध अरविंद देशमुख (४६ वा), दृष्टी हरीश बंकावार (५९ वी), सोहम मंदार देशपांडे (६० वा), सायली विजय कुळकर्णी (६१ वी), आनंदी दीपक ठाकरे (६४ वी), भार्गव अरविंद मांडेकर (६५ वा), काव्या दिनेश राऊत (६९ वी) आणि आराध्या सतीश सुळे (८४ वी) यांनीही जिल्हास्तरावर उल्लेखनीय गुणवत्ता प्राप्त करून शाळेच्या यशात भर घातली.
या यशामागे विद्यार्थ्यांची मेहनत, पालकांचे सातत्यपूर्ण सहकार्य आणि शिक्षकांचे नियोजनबद्ध मार्गदर्शन हे महत्त्वाचे घटक ठरले. मराठी विषयासाठी सौ. ज्योती कोकाटे, सौ. वैशाली पाटील व सौ. मंदाकिनी दांदळे, गणितासाठी सौ. पौर्णिमा शांडिल्य, सौ. श्रद्धा रेलकर व सौ. मीना मुरूमकार, इंग्रजी विषयासाठी सौ. अपेक्षा आवळे, सौ. निशा जोशी व सौ. रेणुका भाले, तसेच बुद्धिमत्ता विषयासाठी सौ. मीना मुरूमकार, सौ. किरण झटाले व सौ. श्रद्धा रेलकर यांनी विद्यार्थ्यांना उत्कृष्ट मार्गदर्शन केले.
या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. अविनाश देव, उपाध्यक्ष श्री. नरेंद्र पाठक, सचिव श्री. मोहन गद्रे, कार्यकारिणी सदस्या सौ. अनघा देव, माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता जळमकर तसेच प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. कीर्ती चोपडे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी, त्यांचे पालक व मार्गदर्शक शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
