दि. ११/०२/२०२६ रोजी श्री रामदास नवमी निमित्त ब्राह्मण सभा संचालित बाल शिवाजी शाळेत मनाचे श्लोक पठण कार्यक्रम अत्यंत उत्साहात व भक्तीमय वातावरणात संपन्न झाला.

दि. ११/०२/२०२६ रोजी श्री रामदास नवमी निमित्त ब्राह्मण सभा संचालित बाल शिवाजी शाळेत मनाचे श्लोक पठण कार्यक्रम अत्यंत उत्साहात व भक्तीमय वातावरणात संपन्न झाला.कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्ज्वलन करण्यात आले. संपूर्ण विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि श्री रामदास स्वामींचे ५१ मनाचे श्लोक एकत्रितपणे भावपूर्ण स्वरात पठण करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या एकसुरातील पठणामुळे वातावरण भक्तीमय व प्रेरणादायी झाले. संपूर्ण परिसर “जय जय रघुवीर समर्थ” या घोषणांनी दुमदुमून गेला. या प्रसंगी मुख्याध्यापकांनी समर्थांच्या विचारांचे महत्त्व पटवून देत विद्यार्थ्यांना आदर्श, संयमी व कर्तव्यनिष्ठ जीवन जगण्याचा संदेश दिला. शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागामुळे कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला.