१० वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात साजरा
दरवर्षीप्रमाणे वर्ग १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी वर्ग ९ वीच्या विद्यार्थ्यांनी निरोप समारंभाचे आयोजन शाळेत करण्यात आले होते. यात वर्ग ९ वी च्या वरदा बिडवई हिने स्वरचित कवितेतून तर श्रीहरी जवंजाळ याने आपल्या भाषणातून वर्ग १० वी च्या विद्यार्थ्यांना शालान्त परीक्षेकरिता शुभेच्छा दिल्या. वर्ग १० वी च्या रसिका गोसावी हिने स्वरचित कवितेतून शाळेप्रती कृतज्ञ भावना व्यक्त केली. ख़ुशी मोहोड व स्नेहा ढोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता जळमकर यांनी विद्यार्थ्यांना ‘जिद्द व चिकाटी ठेवून चांगले नागरिक बना ‘ अशा आशीर्वादपर शुभेच्छा दिल्या तसेच वर्ग शिक्षिका अर्चना देशमुख यांनी विद्यार्थ्यांना शुभाशिष देत मार्गदर्शन केले.
संस्थेचे अध्यक्ष श्री. अविनाश देव, संस्थेचे सचिव श्री.मोहन गद्रे, कार्यकारिणी सदस्य सौ. अनघाताई देव, शाळा समिती सदस्य श्री.राजेंद्र मेंडकी, श्री. नितीन मोहोड, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्ती चोपडे व सौ. भारती कुळकर्णी, सौ. भावना उपासने तसेच सर्व शिक्षिकांनी विद्यार्थ्यांना शुभाशिष दिले. वर्ग १० वीच्या सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य भेट म्हणून देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुरा मल्हार हिने केले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली. सर्वांनी अल्पोपाहाराचा आस्वाद घेतला.