स्वातंत्र्याची प्रेरणा म्हणजे शिवाजी महाराज…. प्रा. स्वप्निल इंगोले

ब्राह्मण सभा संचालित बाल शिवाजी शाळा जठारपेठ येथे गुरुवार दि. 19/02 2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. संस्थेचेअध्यक्ष मा. श्री. अविनाश देव व प्रमुखअतिथी प्रा. स्वप्निल इंगोले यांच्या हस्ते प्रतिमा पूजनकरण्यात आले. अनन्या मुरुमकार व आदिश देशमुख याविद्यार्थ्यांनी ‘शिवरायांचा आदर्श’ या विषयावर मंत्रमुग्ध करणारे आपले मनोगतव्यक्त केले. स्वराज्यात स्त्रियांची आत्मप्रतिष्ठा, आत्मसन्मान व आत्मविश्वास,सुरक्षा आजही प्रेरणादायक आहे. यावर आधारित शिवचरित्रातील प्रेरणादायक प्रसंगशुभ्रा ईधोळ हिने सादर केला व वर्ग 6 वीच्या विद्यार्थ्यांनी ‘स्वराज्याचे बांधूतोरण’ हा प्रेरणा देणारा पोवाडा सादर केला. अदिती कुकडे हिने ShivajiMaharaj The Pride of Nation या विषयांवर आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाच्याअतिथींनी शिवाजी महाराजांचा काळ आणि आजचा काळ या समन्वय साधून आजच्याविद्यार्थ्यांनी कोणते गुण संपादन करावे, अभ्यास  कसा करावा, चारित्र्यसंपन्न बनावे. संकल्पपूर्तीसाठी अविरत प्रयत्न करावेत. तसेच शिवकाळातील भाषासमृद्धी, भविष्य निर्वाह निधी, मानवाधिकार यासारख्या संकल्पना मांडणाऱ्या शिवाजीमहाराज यांच्या जीवन कार्याविषयी अतिशय मार्मिक व वेगवेगळ्या उदाहरणाद्वारेविद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला ब्राह्मण सभा कार्यकारणी सदस्यासौ. वैजयंती पाठक,  माध्यमिकशाळेच्या मुख्याध्यापिका संगीता जळमकर, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका कीर्ती चोपडे,आणि सर्व शिक्षिका पालक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थितहोते. या कार्यक्रमाचे संचालन देवश्री कराळे हिने केले तर कार्यक्रमाचेप्रास्ताविक ज्योती कोकाटे यांनी केले. कार्यक्रमाचा शेवट एकात्मता मंत्राने झाला.