समर्थ भारत अभियान आयोजित राज्यस्तरीय मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धेत बाल शिवाजी शाळेचे उज्ज्वल यश…..

समर्थ भारत अभियान तर्फे आयोजित राज्यस्तरीय मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धेत ब्राह्मण सभा अंतर्गत कार्यरत बाल शिवाजी शाळा, जठारपेठ अकोला येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
या स्पर्धेत क गटातून इयत्ता दुसरीतील कु. अमृता सचिन कराळे हिने राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक मिळवून शाळेचा गौरव वाढविला. तिच्या उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल तिला ट्रॉफी, मेडल व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
तसेच ड गटातून चि. ज्ञानेश अमोल मराठे याने तृतीय क्रमांक प्राप्त केला असून त्याला प्रमाणपत्र व मेडल देऊन गौरविण्यात आले.
याशिवाय कु. शर्विल आशिष फुंडकर व कु. शांभवी शैलेश कुलकर्णी यांनीही मनाचे श्लोकांचे प्रभावी व उत्कृष्ट सादरीकरण करून मेडल प्राप्त केले.
या विद्यार्थ्यांना सौ दिपाली सुहास जोशी व किरण सदानंद मुरूमकर या शिक्षिकांचे मार्गदर्शन लाभले.

या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे व मार्गदर्शक शिक्षिका यांचे  संस्थेचे अध्यक्ष अविनाश देव, सचिव मोहन गद्रे, कार्यकारिणी सदस्य अनघा देव, शाळा समिती सदस्य, बाल शिवाजी माध्यमिक शाळा यांच्या मुख्याध्यापिका संगीता जळमकर, तसेच बाल शिवाजी प्राथमिक शाळा यांच्या मुख्याध्यापिका कीर्ती चोपडे, शिक्षकवृंद व कर्मचारीवर्ग यांनी मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व व्यवस्थापन समितीने सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 🌸