विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीचे क्षेत्र निवडावे – मधुरा ठोंबरे – कुळकर्णी
बालशिवाजी माध्यमिक शाळेला माजी विद्यार्थिनी मधुरा ठोंबरे कुळकर्णी हिने भेट दिली.L.L.B.,L.L.M. ह्या कायद्याच्या पदव्या संपादन केलेली मधुरा सध्या नवरचना विद्यापीठ,बडोदा येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. व International law या विषयात P.hd. करते आहे.यावेळी तिने वर्ग नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांची संवाद साधला व त्यांना करिअर निवडी विषयक मार्गदर्शन केले. कला ,वाणिज्य व विज्ञान शाखांमधील विविध अभ्यासक्रमांची माहिती तिने विद्यार्थ्यांना यावेळी दिली केंद्रीय लोकसेवा आयोग व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचे स्वरूप व अभ्यासक्रम याविषयी सविस्तर मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.आपल्या आवडीचे क्षेत्र निवडताना विद्यार्थ्यांनी त्यात असलेल्या भविष्यातील संधी व त्यातून होणाऱ्या आर्थिक फायद्याचा विचार सुद्धा जरूर करावा.तसेच AI चे आजपासून दहा ते पंधरा वर्षानंतर आपल्या क्षेत्रात किती वर्चस्व राहील याचाही विचार आजपासूनच करावा. प्रत्येकाने आपले आवडीचे क्षेत्र निवडून त्यात उत्तम कार्य करावे जेणेकरून देशसेवेतही आपल्या हातभार निश्चितच लागेल , असे आवाहनही मधुराने यावेळी विद्यार्थ्यांना केले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे तिने दिली.
या कार्यक्रमाला माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता जळमकर टीचर सौ.किरण मुरूमकर टीचर ,वर्ग नववी व दहावीचे विद्यार्थी व शिक्षिका उपस्थित होत्या. या कार्यक्रमाची आठवण म्हणून मधुराला शाळेतर्फे स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले.
