मुंबई येथील हास्य विनोदी कलाकार नयना आपटे यांची बाल शिवाजी शाळेला सदिच्छा भेट
मुंबई येथील प्रसिद्ध हास्य विनोदी अभिनेत्री नयना आपटे यांनी अलीकडेच अकोल्यातील जठारपेठेतील ब्राह्मण सभा संचालित बाल शिवाजी शाळेला सदिच्छा भेट दिली. मागील वर्षी देखील त्यांनी या शाळेला भेट दिली होती आणि यंदा पुन्हा त्यांनी शाळेच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत आपल्या आठवणींना उजाळा दिला. या भेटीत त्यांनी शाळेतील विविध उपक्रमांची माहिती जाणून घेतली, शिक्षकवर्गाच्या कार्याचे मनापासून कौतुक केले आणि विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक व शैक्षणिक प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. त्यांच्या प्रेरणादायी संवादामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवीन उत्साह संचारला. नयना आपटे यांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण शाळेचे वातावरण आनंददायी व प्रेरणादायी झाले.
