बाल शिवाजी शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा 🎉
ब्राह्मण सभा शिक्षण संकुलांतर्गत बाल शिवाजी शाळेत स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला.
माध्यमिक शालांत परीक्षा 2024 मध्ये प्रथम क्रमांक पटकावलेल्या पयोष्णी विक्रम घाईट हिच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
या प्रसंगी संस्थेचे सचिव मा. श्री. मोहन गद्रे यांनी विद्यार्थ्यांना भारताला विश्वगुरू बनविण्यासाठी योगदान द्यावे असे मार्गदर्शन केले, तर सौ. वैशाली देशपांडे यांनी चांगल्या सवयी व शिस्तीचे महत्त्व पटवून दिले.
विद्यार्थ्यांनी राज्यगीत, जयोस्तुते, देशभक्तिपर गीतांचे सादरीकरण करून वातावरण भारावून टाकले. तसेच मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या विषयी माहिती देण्यात आली व विविध स्पर्धांतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. रश्मी जोशी यांनी, आभारप्रदर्शन सौ. अपेक्षा आवळे यांनी तर संचालन वरदा विक्रांत कुलकर्णी (वि. 7 वी) हिने केले.
कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम या गीताने झाली. 🙏
