बाल शिवाजी शाळेत विठ्ठलनामाच्या गजरात आषाढी एकादशी उत्साहात साजरी….
ब्राह्मण सभा संचालित बाल शिवाजी प्राथमिक शाळेत आषाढी एकादशीनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी संपूर्ण शाळा विठ्ठलनामाच्या गजरात न्हालेली दिसली.वर्ग 1 लीतील विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांच्या वेशभूषेत सहभागी होत परंपरेचा उत्साहाने अनुभव घेतला. शौर्य नितीन बंडावार याने विठ्ठलाची आणि अदिती अमोल झामरे हिने रखुमाईची वेशभूषा साकारली. ज्ञानबा-तुकाराम या जयघोषात विद्यार्थ्यांनी रंगतदार फेऱ्या घेतल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून तुकाराम महाराज व गाडगेबाबा यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत स्वच्छता व वृक्षारोपणाचे महत्त्व सांगितले. त्यानंतर विद्यार्थ्यांतर्फे वृक्षवाटपही करण्यात आले.वर्गा-वर्गातून अभंग, भारुडे, गाणी व गोष्टींच्या माध्यमातून आषाढी एकादशीचा कार्यक्रम सादर करण्यात आला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये भक्तीभाव, पर्यावरणप्रेम आणि स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित झाले. प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती किर्ती चोपडे, माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ संगीता जळमकर, भारती कुलकर्णी व किरण मुरूमकार, रागिनी बक्षी तसेच सर्व शिक्षिका, कर्मचारी वृंद उपस्थितीत होते. कार्यक्रम आनंदात पार पडला.
