बाल शिवाजी शाळेच्या विद्यार्थ्यांचे सुयश
जठारपेठ स्थित बाल शिवाजी शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये सुयश प्राप्त केले. खंडेलवाल इंग्लिश स्कूल व कुतूहल संस्कार केंद्र यांच्या तर्फे आयोजित ‘Science Meet २०१८’ मध्ये विविध आंतरशालेय स्पर्धांमध्ये बाल शिवाजी शाळेतील विद्यार्थी सह्भागी झाले होते. त्यात ‘Science Quiz’ मध्ये वर्ग ४ च्या आयुष गजानन जळमकर आणि श्रीप्रसाद पंकज देशमुख यांच्या गटाने उत्तम सादरीकरण करत प्रथम क्रमांक मिळवला. त्यांना प्रशस्तीपत्र व रोख पारितोषिक मिळाले तसेच शाळेला रनिंग ट्रॉफी मिळाली आहे. ‘Do it Yourself ‘ या स्पर्धेत वर्ग ७ वी चा कृष्णा अविनाश बोर्डे व सर्वेश अतुल बकाल यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले तर वर्ग ७ वी ची भक्ती मनीष मेन वर्ग ६ ची संस्कृती विनायक पाठक या विद्यार्थ्यांनी व्दितीय क्रमांक पटकावला. त्यांना प्रशस्तीपत्र व रोख पारितोषिक मिळाले आहे. तर शाळेला रनिंग ट्रॉफी मिळाली आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री.अविनाश देव, संस्थेचे सचिव श्री. मोहन गद्रे, संस्थेच्या कार्यकारिणी सदस्य सौ.अनघाताई देव, माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता जळमकर, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्ती चोपडे व सौ. भारती कुळकर्णी, शिक्षक वृंद व कर्मचारी यांनी कौतुक केले आहे.