बाल शिवाजी शाळेच्या मानसीची बुद्धिबळ स्पर्धेत उत्तुंग भरारी

दि. २ ते ७ नोव्हेंबर २०१९  या कालावधीत अग्रसेन भवन, अकोला येथे ऑल इंडिया ओपन फाईड रेटिंग चेस स्पर्धा २०१९ पार पडली. या स्पर्धेत २४० स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदविला होता. महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यातून स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते. रेटिंग व नॉन रेटिंग अशा २ गटात ही स्पर्धा घेण्यात आली.  नॉन रेटिंग  स्पर्धेतील बाल शिवाजी माध्यमिक शाळेची विद्यार्थिनी मानसी राहुल शिरसाट वर्ग १० वा हिने १० राऊंड पैकी ६.५ राऊंड जिंकून १२६८ रेटिंग चे मानांकन मिळवले. अकोल्यासाठी अभिमानाची बाब म्हणजे संपूर्ण  नॉन रेटिंग स्पर्धेमधून मुलींमधून तिने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तिला सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह तसेच २१०००/- रु. रोख चे पारितोषिक प्रदान करण्यात आले. याआधी खापोली, रायगड, येथे संपन्न झालेल्या शालेय राज्यस्तरीय स्पर्धेत सुद्धा मानसीने आपल्या उत्कृष्ट बुद्धिबळ खेळाचे प्रदर्शन केले होते. मानसीला या खेळासाठी ब्रिलियंट चेस चे श्री. जितेंद्र अग्रवाल यांचे  मार्गदर्शन लाभले. 
मानसीचे संस्थेचे अध्यक्ष श्री.अविनाश देव, सचिव श्री. मोहन गद्रे,कार्यकारिणी सदस्य सौ. अनघाताई देव, शाळा समिती सदस्य, मुख्याध्यापिका सौ. संगिता जळमकर, सौ.किर्ती चोपडे  व सौ. भारती कुळकर्णी, शिक्षकवृंद व कर्मचारी वर्ग यांनी कौतुक केले.