बाल शिवाजी शाळेची विद्यार्थीनींचे राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेत सुयश
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद , पुणे तर्फे व राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (NCERT ), नवी दिल्ली यांचे मार्फत घेण्यात आलेल्या वर्ग १० वी च्या राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेत बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या नमस्वी नारायण शेकोकार आणि साक्षी नरेंद्र कराळे ह्या विद्यार्थीनी यशस्वी ठरल्या आहेत .या विद्यार्थीनींची दुसऱ्या फेरीकरिता निवड झाली आहे . या परीक्षेत SC प्रवर्गातून नमस्वी नारायण शेकोकार ही राज्यातून प्रथम आली आहे. यशस्वी विद्यार्थीनीचे संस्थेचे अध्यक्ष श्री.अविनाश देव,सचिव श्री.मोहन गद्रे,कार्यकारिणी सदस्य सौ.अनघा देव,शाळा समिती सदस्य,बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.संगिता जळमकर,बाल शिवाजी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.किर्ती चोपडे, सर्व शिक्षिका,कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले. पुढील परीक्षेकरिता शुभेच्छा दिल्या .