बाल शिवाजी प्राथमिक शाळेत गोकुळाष्टमी उत्साहात…….

ब्राह्मण सभा शिक्षण संकुलांतर्गत बाल शिवाजी प्राथमिक शाळेत गोकुळाष्टमी व दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे संचलन वर्ग तिसरीची विद्यार्थीनी अद्वैता शिवाजी देशमुख ज्ञानेश अमोल मराठे यांनी केले. श्रीकृष्ण प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून श्रीकृष्णच्या प्रमुख अतिथी म्हणून लाभलेल्या मा. सौ वैशाली अजय पाटील यांचे स्वागत सुरभी शिरीष परळीकर हिने पुष्प देऊन केले, कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या श्रीहरी स्तोत्राने करण्यात आली. त्यानंतर ‘कालिया मर्दन’ ही नाटिका सादर करण्यात आली. तसेच आई व मुलाच्या प्रेमाची‌ आईच्या मनात उसळलेली प्रेम भावना ही यशोदेचे मनोगत सादर करण्यात आली. दुष्टावर विजय मिळवण्याची गोष्ट नील लव्हाळे उत्तमरीत्या सादर केले. तसेच सर्व विद्यार्थिनींनी ‘कान्हा सो जा जरा’ या गीतावर बहारदार नृत्य सादर केले. प्रमुख अतिथी मा. सौ वैशाली पाटील यांनी यांनी बोधपर कथेतून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सर्व विद्यार्थ्यांनी दहीहंडीचा कलाविष्कार सादर केला. कार्यक्रमासाठी वर्गशिक्षिका साक्षी सहस्त्रबुद्धे, अश्विनी पांडे, शुभांगी तिडके, पर्यवेक्षिका रागिणी बक्षी, नृत्यशिक्षिका दिव्या डहाके, संगीत शिक्षिका सरोज जोशी, तबलावादक श्रीकांत कोरान्ने त्यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमानंतर सर्वांना प्रसाद देण्यात आला. या कार्यक्रमाला शाळेचे सचिव मा.मोहन गद्रे, पालक शिक्षक संघ सदस्य चंद्रकांत चव्हाण, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका कीर्ती चोपडे, माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता जळमकर व शाळेतील शिक्षिका उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता श्रीकृष्णाच्या नाम गजरात झाली.