नियमित योगसाधने द्वारे विद्यार्थ्यांनी स्व विकास साधावा.सौ. मनीषा नाईक
ब्राह्मण सभा अंतर्गत बालशिवाजी माध्यमिक शाळेत 21 जून रोजी योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते 25 वर्षांपासून योगाभ्यासाचे धडे देणाऱ्या सौ.मनीषा नाईक मॅडम अध्यक्षस्थानी होत्या.कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्ज्वलनाने करण्यात आली.
वर्ग दहावीची विद्यार्थिनी अदिती शंकर पाटील हिने ओंकार साधनेचे महत्त्व आपल्या भाषणातून विशद केले, तर आरोही राहुल महाशब्दे हिने वर्ग 10 वी साठी आयोजित योगवर्गाबद्दलचे मनोगत व्यक्त केले. यानंतर विद्यार्थ्यांनी विविध योगासनांचे प्रात्यक्षिक उत्कृष्टरित्या सादर केले.
शाळेतर्फे दरवर्षी वर्ग दहावीसाठी योग वर्गाचे आयोजन केले जाते. त्यात योगप्रवेश हे परीक्षा घेतली जाते .या परीक्षेत यशस्वी नऊ विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचे कौतुक या प्रसंगी करण्यात आले. याप्रसंगी सौ मनीषा नाईक यांनी यावर्षीच्या योग दिनाची ‘ एक पृथ्वी एक आरोग्यासाठी योग’ या विषयाबद्दल माहिती दिली; तसेच आळस झटकून स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावे व रोज किमान 20 मिनिटे योगासाठी द्यावीत असे आवाहनही त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
कार्यक्रमाचे संचालन हर्ष घुगे यांनी केले कार्यक्रमाची सांगता योगप्रार्थनेने करण्यात आली.
