अनामवीरा गीत गायक स्पर्धेत बाल शिवाजी शाळेचा प्रथम क्रमांक…

स्कूल ऑफ स्कॉलर्स तर्फे आयोजित अनामवीरा गीत गायक स्पर्धेत बाल शिवाजी शाळेने आपला उत्कृष्ट ठसा उमटवत प्रथम क्रमांक पटकावला. या विजयानिमित्त शाळेला ट्रॉफी प्रदान करण्यात आली.

गट ‘अ’ मध्ये केजी- 1 चा स्वराज समीर थोडगे याने प्रभावी सादरीकरण करून प्रथम क्रमांक मिळविला.

गट ‘ब’ मधून बाल शिवाजी शाळेच्या खालील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला :
गिरीजा प्रसाद रानडे, जीविका संतोष रामटेके, जान्हवी गणेश अढाऊ, महेश किशोर इंगळे, पार्थ अनंत म्हैसने, देव विजय देशमुख, विद्येश संदीप पाटील आणि समृद्धी श्रीकांत झंझाळ.

कार्यक्रमात तबलावादन सोहम मंदार देशपांडे यांनी तर साईट रिदम अर्णव रवींद्र भांबेरे यांनी दिला. या यशाबद्दल मुख्याध्यापिका, शिक्षकवर्ग व पालकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.