बाल शिवाजी शाळेतील शिक्षिकांना शिक्षक दिनी पुरस्कार प्रदान

ब्राह्मण सभा शिक्षण संकुलांतर्गत बाल शिवाजी प्राथमिक व माध्यमिक शाळेत शिक्षक दिन उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात  डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. या प्रसंगी शाळेतील शिक्षिका सौ. नयना जोशी. सौ. अंजली दिवेकर, सौ. शीतल थोडगे, सौ. अरुणा  नावकार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. संस्थेचे अध्यक्ष श्री. अविनाश देव यांनी आपल्या मार्गदर्शनात सर्व शिक्षिकांनी  ‘ऑनलाईन शिक्षणाचे आव्हान ‘ यशस्वीपणे पेलल्याबद्दल कौतुक केले आणि सर्वांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच एक शिक्षक म्हणून सर्वांनी  नेहमी नाविन्याचा ध्यास घेण्याचे आवाहन त्यांनी सर्व शिक्षिकांना केले. यावेळी शाळेत कार्यरत सर्व शिक्षिकांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. निलेश देव मित्र मंडळ, अकोला यांच्यातर्फे  बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता जळमकर व बाल शिवाजी प्राथमिक शाळेच्या शिक्षिका सौ. समिधा देशमुख यांना ‘कर्तृत्वान शिक्षक पुरस्कार – २०२१’ प्रदान करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री. अविनाश देव यांच्या हस्ते सौ. संगीता जळमकर व  सौ. समिधा देशमुख यांना सन्मानित करण्यात आले.  कार्यक्रमाचे संचालन सौ. समिधा देशमुख यांनी केले. कार्यक्रमाची सांगता एकात्मता मंत्राने झाली. या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष श्री. अविनाश देव,उपाध्यक्ष श्री. बाबासाहेब पाठक,सचिव श्री.मोहन गद्रे, सहसचिव सौ. वैशाली देशपांडे, संस्थेचे कार्यकारिणी सदस्य सौ.अनघाताई देव, श्री. नरेंद्र देशपांडे, सौ. वैजयंती पाठक,  बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता जळमकर,बाल शिवाजी प्राथमिक शाळेच्या  मुख्याध्यापिका सौ. किर्ती चोपडे,  व पूर्व प्राथमिक शाळेच्या सौ. भारती कुळकर्णी, सर्व शिक्षिका, कर्मचारी उपस्थित होते. शिक्षक दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, अकोला तर्फे आयोजित कार्यक्रमात मा. आ. रणजित पाटील व डॉ. सौ. अपर्णाताई पाटील यांच्या हस्ते  ‘कृतिशील मुख्याध्यापिका पुरस्कार – २०२०’ हा पुरस्कार बाल शिवाजी प्राथमिक  शाळेच्या  मुख्याध्यापिका सौ. किर्ती चोपडे व बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या शिक्षिका सौ. मंदाकिनी दांदळे यांना ‘कृतिशील शिक्षक पुरस्कार – २०२०’ प्रदान करण्यात आला. 
Covid – 19 च्या विपरीत परिस्थितीत मार्ग काढत शिक्षिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने      शिक्षक दिनाचा आगळा वेगळा कार्यक्रम सादर केला.  डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रती आदर व्यक्त करत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करताना सौ. अपेक्षा आवळे ह्यांनी Covid – 19  च्या विपरीत परिस्थितीत  शिक्षकांसमोरची आव्हाने व शिक्षणातील नव्या संधी यावर आपले मत प्रदर्शित केले. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे जीवनकार्य मोहित खरोटे ह्याने आपल्या  भाषणातून विशद केले तर भारतातील प्रथम महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची माहिती दिपाली धांडे हिने प्रस्तुत केली. शिक्षकदिनी महाराष्ट्राचे प्रेमळ शिक्षक साने गुरुजी यांचे स्मरण न झाले तर नवलच ! त्यांचा आदर्श घेऊन विद्यार्थ्यांनी आपले मार्गक्रमण करावे यासाठी सौ. अंजली शेटे ह्यांनी साने गुरुजींच्या जीवनातील गोष्ट सांगून विद्यार्थ्यांना प्रेरित केले. मधुरा किडिले हिने ‘शिक्षक एक राष्ट्रनिर्माता कसा ठरतो ‘ हे आपल्या शब्दात व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अखेरीस सौ. मंदाकिनी दांदळे यांनी विद्यार्थ्यांनी कसे असावे याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या online  कार्यक्रमाचे संचालन ओजस जोशी याने केले. हा सर्व कार्यक्रम व्हिडीओ स्वरूपात सादर करण्यात आला.  कार्यक्रमाच्या सरते शेवटी सर्व शिक्षिका व  विद्यार्थ्यांच्या छायाचित्ररूपी आठवणी गाण्याच्या माध्यमातून सादर करण्यात आल्या. या सर्व कार्यक्रमाला शाळेच्या मुख्यध्यापिका सौ संगीता जळमकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तर संस्थेचे अध्यक्ष श्री. अविनाश देव, कार्यकारिणी सदस्य सौ.अनघाताई देव यांनी विद्यार्थ्यांच्या या संकल्पनेचे कौतुक केले. 

sd