बालशिवाजी शाळेत शिक्षकदिन उत्साहात साजरा
विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या जडणघडणीत शिक्षकांची भूमिका किती महत्वाची आहे ही जाणीवकरून देणारा तसेच शिक्षकांप्रती असणारा आदरभाव आणि कृतज्ञता व्यक्त करणारा ‘शिक्षकदिन’ बाल शिवाजी शाळेत ५ सप्टेंबर २०१७ रोजी उत्साहात साजरा करण्यात आला.
शिक्षकदिनाचे औचित्य साधून शाळेत इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी ‘स्वयंशासनाचा’कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .सर्व विद्यार्थीशिक्षकांनी वर्गा वर्गात उत्साहाने अध्यापन केले. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष पद साक्षी सोळंके हिने भूषवले. संजीवनी धांडे व सुमेधा कस्तुरे यांनी स्वरचित कवितेतून शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
अपूर्वा हिराळकर ने डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे जीवनकार्य आपल्या भाषणातून सांगितले. वेदांगी पाटील हिने पी.व्ही.सिंधू आणि पुलेला गोपीचंद यांच्यातील गुरुशिष्यांच्या नात्याची माहिती आपल्या भाषणातून दिली.
विद्यार्थ्यांच्या जीवनातील शिक्षकांची भूमिका आपल्या भाषणातून मेहरा मिरगे हिने मांडली.यशराज तायडे याने डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची विनम्रता दर्शविणारी गोष्ट सांगितली. वर्ग दहावीच्या साक्षी सोळंके हिने आपल्या अध्यक्षीय भाषणातून समाजबांधणीत शिक्षकांचे असणारे योगदान विशद केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकांक्षा इंगोले हिने उत्कृष्टपणे केले.
संस्थेचे अध्यक्ष श्री. अविनाश देव यांनी सर्व शिक्षकवृंदांना शिक्षकदिनाच्या शुभेच्छा दिल्या.शिक्षकांचे विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत असणारे महत्त्वपूर्ण स्थान व त्याचबरोबर सुजाण नागरिक घडविण्यात शिक्षकांची जबाबदारी आपल्या भाषणातून स्पष्ट केली. संस्थेतर्फे सर्व शिक्षकांचा पुस्तकभेट देऊन सन्मान करण्यात आला व शिक्षिकांसाठी सहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला .
या कार्यक्रमाला संस्थेचे सचिव श्री. मोहन गद्रे,कार्यकारिणी सदस्या सौ. अनघा देव,शाळा समिती सदस्य ,सर्व मुख्याध्यापिका ,सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी,सेवकवर्ग उपस्थित होते.