बालशिवाजीची जलजागृती फेरी

जल व्यवस्थापनाबाबत जन  जागृती व्हावी  म्हणून स्थानिक बालशिवाजी शाळेत जल जागृती सप्ताहा अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.  या कार्यक्रमास अतिथी म्हणून नवनिर्वाचित नगर सेविका मा.सौ.धनश्री देव व  मा. सौ. गीतांजली शेगोकार  लाभल्या होत्या.
त्यांचे स्वागत माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. अग्रवाल व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. कीर्ती चोपडे यांनी केले.
उपस्थित मान्यवर,शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी व विध्यार्थी या सर्वांनी ‘जलसंवर्धनाची’ प्रतिज्ञा घेतली. या निमित्ताने प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी विद्यार्थांनी जलसंवर्धनाचा संदेश देणारी फलके हातात घेऊन ‘जल है तो कल है’ अश्या घोषणा देत फेरी द्वारे जनजागृती केली.
यानिमित्ताने पाणी वाचवा या विषयावर चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली व जलसंवर्धनाचा संदेश देण्यात आला.