बाल शिवाजी शाळेत शिक्षक दिन संपन्न
शनिवार ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचा आगळा वेगळा कार्यक्रम बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या वर्ग १० वी च्या विद्यार्थ्यांनी online सादर केला. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे जीवनकार्य सानिका संगवई हिने आपल्या इंग्रजी भाषणातून विशद केले तर ऋचा देशपांडे हिने माशेलकरांच्या आयुष्याला भावे सर यांच्यामुळे कशी कलाटणी मिळाली या विषयीची उत्तम गोष्ट सादर केली.
अनुराधा खर्चे हिने स्वरचित कविता तयार केली. सोहम राय, श्रेयस पाटील, समृद्धी डांगे, मधुरा मल्हार ह्या विद्यार्थ्यांनी कविता उत्तमरित्या स्वरबद्ध केली आणि संगीत राघवेंद्र करंडे याने दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदित्य चतरकर, आकांक्षा व्यास यांनी केले.
या संपूर्ण कार्यक्रमाचा नयनरम्य व्हिडिओ नमस्वी शेगोकार, मानसी डाबरे यांनी तयार केला. विद्यार्थ्यांना या कार्यक्रमासाठी सौ. स्वाती बापट. सौ. रश्मी जोशी, सौ. सुनिता कोरडे, सौ. अंजली महाजन, सौ, अपेक्षा आवळे या शिक्षिकांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सांगता वरदा बिडवई हिच्या एकात्मता मंत्राने करण्यात आली. या कार्यक्रमाचा आस्वाद वर्ग १ ली ते १० वी च्या सर्व विद्यार्थ्यांनी online घेतला.
विद्यार्थ्यांनी उत्कृष्टरीत्या सादर केलेल्या या online कार्यक्रमाचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष श्री. अविनाश देव,सचिव श्री.मोहन गद्रे,कार्यकारिणी सदस्य सौ.अनघा देव,ब्राह्मण सभा कार्यकारिणी सदस्य,शाळा समिती सदस्य, बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता जळमकर, बाल शिवाजी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्ती चोपडे, सर्व शिक्षिका, कर्मचारी यांनी केले आहे.