बाल शिवाजी शाळेची माध्यमिक शाळांत परीक्षेत उत्तुंग भरारी

अकोला स्थानिक जठारपेठ स्थित बाल शिवाजी माध्यमिक शाळेत दरवर्षी प्रमाणे घवघवीत यश प्राप्त करीत१३ वर्षांची १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.

महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या शाळांत प्रमाणपत्र परीक्षेत बाल शिवाजी शाळेने आपली परंपरा कायम ठेवत १०१ पैकी ५७ विध्यार्थ्यानी ९० टक्के च्या वर गुण मिळवून यश संपादन केले.

कु सुरभी अनिल देशपांडे हिने गणित, संस्कृत व समाज शास्त्र या विषयात १०० गुण मिळविले व आरोही रामदास खोडकुंभे हिने गणित व संस्कृत विषयात १०० मराठी विषयात ९९ गुण मिळविले असून या दोघींनीही ९९. २० टक्के गुण मिळवून शाळेतून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. आरोही खोडकुंभे हिला कलागुणांचे ४गुण मिळाले असून तिचे १००% गुण आहेत.

तर अथर्व अजित पाटखेडकर याने ९९%टक्केगुण घेऊन शाळेतून दुसरा आला आहे अथर्वला देखील कलागुणांचे ५ गुण मिळाले असून त्याचे १००%गुण आहेत. अथर्व समीर गडकरी याने ९८. ४०% गुण घेत शाळेतून तिसरा क्रमांक पटकाविला आहे. प्रियंका प्रशांत डबीर हिने९८.२०% गुण घेत शाळेतून चौथ्या क्रमांकावर आली आहे तसेच तिला कलेचे ९गुण मिळाले असून १००% गुण झाले आहेत. १००%,साक्षी संजय गाडगे व प्रत्युष शैलेश कुलकर्णी यांनी ९७. ८०% गुण घेत शाळेतून पाचवा क्रमांक पटकाविला आहे.साक्षी दिलीप पाटकर हिला १००% गुण मिळाले आहेत.

संस्थेचे अध्यक्ष अविनाश देव,सचिव मोहन गद्रे, कार्यकारिणी सदस्या अनघा देव, शाळा समिती सदस्य ,मुख्याध्यापिका शोभा अग्रवाल,कीर्ती चोपडे,संगिता जळमकर,भारती कुलकर्णी तसेच सर्व शिक्षक वृंद यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले आहे.